बातम्या-फटाफट

प्रत्येक जण रोज वाचतोच पण त्यामध्ये त्याला काय जास्त आवडत ते जास्त वाचतो इथे इंटरनेट वरती,बऱ्याच वेळेला आपण क्लिक करून बऱ्याच लिंक जमा करतो ओपन झाल्यावर लक्षात येत आपल्या कामाचे नाही.

यावर विचार करून आणि वाचकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन हा प्रयोग आहे मी मराठी चा https ://meemarathi.in. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटले ते.

Saamana (सामना)

meemarathi logo 01

धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड

बांगलादेशींकडे हिंदुस्थानातील जन्म दाखले असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. बोगस कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी मतदान कार्डसाठी अर्ज करत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 12 बांगलादेशींना मालेगावात अटक झाली. या बांगलादेशींना हिंदुस्थानातील जन्म दाखला मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोन आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता....

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 02

शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आनंद टप्प्याटप्प्याने हिरावून घेण्याचा विडाच उचलेला दिसतोय. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाकाच त्यांनी लावला आहे. यावेळी शिंदेंच्या ‘आनंदाचा शिधा’च त्यांनी संपवून टाकला. अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा’ योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच काय, तर त्या योजनेबाबत...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 03

लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार

होळी-धुळवडीला काही दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच लहान मुले व तरुणाईने रंगांची उधळण सुरू केली आहे. या उत्साहात रेल्वे मार्गाजवळील वस्त्यांतील मुलांकडून लोकल ट्रेनवर रंग मिसळलेल्या पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन व पोलीस सतर्क झाले आहेत. फुगे फेकणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष वॉच ठेवला असून रेल्वे...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 04

गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू

भाजपचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याच्या कथित प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तुषार खरात या पत्रकाराला अटक केली गेल्याबद्दल संबंधित पीडित महिलेने खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘तोंड बंद ठेव, नाहीतर तुषार खरातची जी हालत केली, ती तुझीपण करू,’ अशा धमक्या आपल्याला येत असल्याचे या महिलेने म्हटले...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 05

राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे

मुंबईसह मोठय़ा शहरात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी करण्यात येते. पण आता ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत परिवहन विभागाच्या वतीने खास उपकरणे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 06

बंद गिरण्या सुरू करून हजारो कामगारांचे संसार वाचवा, अरविंद सावंत यांची मागणी

कोरोनाचे कारण देत बंद केलेल्या पोदार, टाटा आणि इंदू मिल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोळा हजारांवर कामगारांचे संसार वाचवा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. मुंबईत काही वर्षांआधी तब्बल 54 मिल होत्या. यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे लाखो संसार या मिलवर अवलंबून होत्या, मात्र कालांतराने या मिल बंद...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 07

प्रार्थना स्थळांवरील रात्रीचे भोंगे बंद, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही, तसेच ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांची परवानगी रद्द केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 08

पीओपी बंदीविरोधात मूर्तिकारांचा आक्रोश, गणेशमूर्तीशाळांचे काम ठप्प

पीओपीबंदीच्या विरोधात राज्यभरातील मूर्तिकार आज परळच्या नरे पार्कमध्ये एकवटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पीओपीच्या मूर्तींवर बंदी आली आहे. मुंबई महापालिकेने माघी गणशोत्सवात या आदेशाची अंमलबजावणी केली. त्यानंतर आता भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवावर या बंदीचे सावट आहे. परिणामी राज्यभरातील शेकडो मूर्तिशाळांमध्ये काम ठप्प झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो मूर्तिकारांचा रोजगार...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 09

प्रासंगिक – कलाकारांची आळंदी

>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ देशाची  आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबापुरीमध्ये एका मोठ्या उपक्रमाला शासन स्तरावर सुरुवात झाली आहे. या वर्षी महाराष्ट्रासाठी दोन मोठ्या दृश्य कलाकारांचा पद्म पुरस्काराने सन्मान झाला. ही बाब आनंदाची आणि गौरवाची आहे. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आणि अक्षर सुलेखनकार अच्युत पालव या दोन दृश्य...

Saamana (सामना)

Read more
meemarathi logo 10

दहशतवाद्यांनी जाफर एक्प्रेस हायजॅक केली, बलुचिस्तान भागात तुफानी गोळीबार; 30 पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिले आहे. क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्प्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे 30 सैनिक ठार झाले असून 214 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यात सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश...

Saamana (सामना)

Read more

Device & Location Info

Fetching data...

Location:

Device Information: