धावत्या बसमध्ये तरुणीने एक-एक करून काढले सगळेच कपडे, मग केले असे काही…!

0

ऑस्ट्रेलियातील एका बसमध्ये टिपलेला सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. लोक हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत आहेत. बोन्डी बीच बस स्टॉपजवळ असताना या बसमध्ये एका तरुणीने अचानक आपल्या जागेवरून उठून सगळेच कपडे काढले. यानंतर तिने जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. बसच्या सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याची दखल देशाच्या परिवहन मंत्र्यांनी घेतली. तसेच बसमध्ये अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

मैत्रिणीसोबत बसली होती, अचानक उठून काढले कपडे… व्हिडिओमध्ये दिसून आले की बसमध्ये प्रवास करणाऱ्यांत दोन तरुणी सुद्धा होत्या. सुरुवातीला त्या अगदी शांत चित्त बसलेल्या होत्या. पण, काही मिनिटातच एक तरुणी अचानक आपल्या जागेवरून उठली. एक-एक करून आपले सगळेच कपडे काढले आणि बसमध्ये असलेल्या एका पाइपजवळ गेली. यानंतर तिने नग्न अवस्थेत पोल डान्स सुरू केला.divyamarathi.bhaskar.com

अचानक घडलेला हा प्रकार पाहून सगळेच हैराण झाले. ती तरुणी इतक्यातच थांबली नाही. स्ट्रिप करून पोल डान्स सादर केल्यानंतर तशाच अवस्थेत ती प्रवाशांकडे पोहोचली. तसेच परफॉर्मन्स आवडली असेल तर पैसे द्या म्हणत पैसे सुद्धा गोळा करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडत असताना बसच्या कंडक्टरने पोलिसांना फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. तोपर्यंत एक स्टॉप आला. बस थांबताच त्या तरुणीने आपल्या अंगावर एक शॉल घातला आणि मैत्रिणीसोबत बसमधून निघूनही गेली. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ शेअर करत असताना संताप व्यक्त करत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करताना तिने किमान बसमध्ये असलेल्या लहानग्यांचा तरी विचार करायला हवा होता अशा प्रतिक्रिया येत आहेत.

Share.

Leave A Reply