आयसीसी महिला विश्व टी-20 :भारताचा डाव 0/0 ने सुरुवात न होता 10/0 ने का झाला?

0

आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने मिताली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांसमोर 134 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय महिला मैदानात उतरण्यापूर्वी त्यांच्या धावफलकावर 10 धावा आधीच लागल्या होत्या.

tamil.samayam.com

कारण पाकिस्तानच्या संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी करताना खेळपट्टीला नुकसान पोहचवल्याने त्यांना 10 धावांची पेनल्टी लागली होती. पाकिस्तानच्या फलंदाजांकडून धाव घेत असताना खेळपट्टीमध्ये चूकिच्या क्षेत्रात धावण्याची चूक झाली. त्याचा फटका म्हणून त्यांना 10 धावांची पेनल्टी बसली.खेळपट्टीला जर एकदा नुकसान पोहचवले तर पाच धावांची पेनल्टी बसते पण पाकिस्तानकडून ही चूक दोनदा झाल्याने भारताला 10 धावांचा फायदा झाला. यामुळे एकही चेंडू खेळण्याआधीच भारताच्या धावफलकावर 10 धावा दिसत होत्या.पाकिस्तानकडून पहिल्यांदा 18 व्या षटकात बिस्माह मारुफ आणि निदा दार फलंदाजी करत असताना चूक झाली तर दुसरी चूक 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नाहीदा खान आणि सिद्रा नवाझ धाव घेण्याचा प्रयत्न करताना झाली. पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा त्यांच्या धावफलकावर 7 बाद 135 धावा असे दिसत होते परंतू 2 वेळा गैरसमज झाल्याने त्यांची सुधारीत धावसंख्या 133 करण्यात आली.

gqindia.com

या सामन्यात भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय फलंदाजांनी एकूण 120 धावा केल्या तर 7 धावा त्यांना अतिरिक्त धावा मिळाल्या असे मिळून भारताने 127 धावा केल्या आणि भारताला मिळालेल्या पेनल्टीच्या 10 धावांमुळे एकूण 137 धावा करत भारताने सामना जिंकला. 10 धावांच्या पेनल्टीबद्दल पाकिस्तानची कर्णधार म्हणाली, “मी पंचांबरोबर चर्चा केली आहे. त्यांनी मला सांगितले की आमच्या खेळाडूंना तीन वेळा सावध करण्यात आले होते आणि त्यानंतर आम्हाला 10 धावांची पेनल्टी बसली आहे.” “आम्हाला सावध केल्यानंतरही अामच्याकडून गैरवर्तवणुक झाली आहे. आम्ही खेळपट्टीमध्ये चूकिच्या क्षेत्रात धावलो. आम्हाला यावर काम करावे लागणार आहे. हे आमच्याबरोबर पहिल्यांदाच घडले नाही याआधीही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत असे झाले आहे.” या स्पर्धेत भारतीय संघ दोन विजयांसह ब गटात अव्वल स्थानी आहे. यापुढचा भारताचा सामना आयर्लंड विरुद्ध 15 नोव्हेंबरला आहे.

cricketcountry1.com

Share.

Leave A Reply