व्हाट्सअँप द्वारे आपली कमाई करा डबल, व्हाट्सअँप देणार ट्रेनिंग, जाणून घ्या सविस्तर

0

व्हाट्सअँप चा वापर आपण आतापर्यंत फक्त मित्रांसोबत चॅटिंग करण्यासाठी किंवा व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याकरता करत आला असाल परंतु आता व्हाट्सअँप द्वारे पैसे देखील कमावू शकता आणि त्याद्वारे आपले उत्पन्न देखील डबल करू शकता. व्हॉटसअँपने काही दिवासांपूर्वी ‘व्हाट्सअँप बिसनेस’ हे व्हाट्सअँप चे दुसरे अँप लॉन्च केले आहे त्याद्वारे आपल्या सध्याच्या व्यवसायाला अधिक लोकांपर्यंत पोहचवून अधिक कमाई करू शकता. हा उद्देश साध्य करण्याकरता व्हाट्सअँप ने कंफेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) सोबत करार केला आहे. सीआईआईच्या माहितीनुसार व्हाट्सअँप लहान व्यापारी व उद्योजकांचे व्यवसाय वृद्धिंगत करण्याकरता सीआईआई च्या एसएमई टेक्नोलॉजी फैस‍िल‍िटेशन सेंटर चा वापर करेल.

digestafrica,com

हे सेंटर नोव्हेंबर 2016 साली सुरु केले गेले आहे. सीआईआईच्या माहितीनुसार व्हाट्सअँप ट्रेनिंग मध्ये व्हाट्सअँप बिसिनेस चा वापर कसा करावा त्याकरता ट्रेनिंग मटेरियल सुद्धा दिले जाईल जे आपल्याला सीआईआई च्या वेबसाइट www.ciisme.in वर उपलब्ध आहे. सीआईआई च्या एक सर्वे नुसार एसएमईच्या भारतामध्ये 70% लघु उद्योगांनी त्यांचा व्यवसाय व्हाट्सअँप बिसिनेस द्वारे वाढविला आहे. व्हाट्सअँप बिसिनेस मुळे त्यांची विक्री खूप प्रमाणात वाढली आहे. अधिक माहितीसाठी www.whatsapp.com/business या संकेत स्थळाला भेट द्या.

iotgadgets.com

Share.

Leave A Reply