व्हीआयपी विमानप्रवाशांसाठी हवाईसुंदरींना द्यावी लागते अशी सेवा!

0

आजकाल पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या जशी वाढली आहे तसेच प्रवासासाठी विमानाला अधिक प्राधान्य देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. विमानात हवाई सुंदरी प्रवाशांना सेवा देण्याचे काम करत असतात. तुमचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील असतात. अर्थात इकोनॉमी वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणारी सेवा सामान्य असली तरी बिझिनेस क्लास मधून प्रवास करणाऱ्यांना खास सेवा या सुंदऱ्या देतात. आपल्याला वाटते तितके हवाई सुंदरीचे काम सोपे नाही. विविध प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण घ्यावे लागते.

त्या सुंदर तर असल्या पाहिजेतच पण हसतमुखाने सेवा देणे हे त्यांचे महत्वाचे काम असते. त्यासाठी मेकअपची विशेष काळजी त्यांना घ्यावी लागते. व्हीआयपी प्रवाशांना सेवा देताना त्यांना काही बंधने पाळावी लागतात. विमान कंपन्या अगोदरच हवाई सुंदरीनि कोणत्या कंपनीचे आय लायनर, लिपस्टिक, आय शॅडो वापरायच्या आणि कोणता गणवेश घालायचा हे ठरविलेले असते.

indiaeducation.net

त्यामुळे तेच मेकअप साहित्य त्यांना वापरावे लागते. व्हीआयपी प्रवाशांना सेवा देताना ठराविक वेळेनंतर लिपस्टिक ठीकठाक करावी लागते. एमिरेट्स विमान कंपनीने तर हवाई सुंदरीने कशी केशरचना करायची याचेही नियम तयार केले आहेत. फर्स्ट क्लास प्रवाशांना सेवा देताना या हवाई सुंदरीना अनेक प्रकारच्या मद्याची माहिती असावी लागते. या प्रवाशांना थ्री कोर्स डिनर दिले जाते. संबंधित प्रवाशाच्या आवडी निवडी हवाई सुंदरींना अगोदरच माहिती करून घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सेवा द्यावी लागते.

Share.

Leave A Reply