उन्हाळ्यात ही 8 फळे आवर्जून खाल्ली पाहिजेत..

0

मित्रांनो सद्ध्या अगदी प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. आणि म्हणूनच या दिवसात उष्माघात या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. तरी आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे यातून बाहेर पडण्यात तुम्हाला मदत मिळेल.. आणि बऱ्याच प्रमाणात त्रास कमी जाणवेल.

१. सध्या उन्हाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात सेवन होणार फळ म्हणजे टरबुज. होय अगदी बरोबर कारण यात प्रचंड प्रमाणात पाणी असतं. आणि म्हणूनच टरबूज तुम्ही आवर्जून फ्रिज मध्ये ठेवावेच. ज्यानेकरून उन्हातून आल्यानन्तर टरबूज सेवन केल्याने तुम्हाला शरीरातील थंडावा जाणवेल.

२. द्राक्ष : मित्रांनो द्राक्ष हा असा पदार्थ आहे ज्यात प्रचंड प्रमाणात पाणी तसेच प्रोटीन सुद्धा असतात जो की आपली तहान ही भागवितो शिवाय भूक ही. आणि यामुळे टरबूज बरोबरच उन्हाळ्यात यालाही तेवढंच महत्व दिल्या जातं. म्हणून द्राक्ष सुद्धा सेवन करावे.

३.संत्र/मोसंबी : मित्रांनो उन्हाळ्यात आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येतो. आणि म्हणूनच आपल्या शरीरातील खनिजांचे प्रमाण खूप कमी होत. ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. आणि म्हणून यासाठी आपण संत्र्याच्या ज्युस किंवा मोसंबी च्या ज्युस च सेवन करायला हवं.

४. खरबूज : खरबूज हे प्रोटीन च्या बाबतीत विचार केला तर अगदी जास्त प्रमाणात फायदेशीर ठरते. आणि म्हणूनच खरबुज खावं आणि खरबूज शक्यतो खरेदी करताना गोड वास येतो तेच घ्यावे. जे की आतून चांगलं निघेल.

५. कलिंगड : कलिंगड हे अगदी जास्त प्रमाणात खाल्ल्या जातं. हे सुद्धा शरीरातील पाण्याचं प्रमाणात व्यवस्थित ठेवण्यात मदत करत. आणि यामुळे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरते.

६. पेरू : पेरूमुळे आपल्याला खनिजे, तसेच व्हिटॅमिन C मिळतं आणि म्हणूनच हे आपण खास करून उन्हाळ्यात खायलच हवं.

७. लिंबू : मित्रांनो लिंबू जे की क जीवनसत्त्व असलेलं माहेरघर म्हणू शकतो. यात अगदी जास्त प्रमाणात क जीवनसत्त्व असत. यामुळे आपण गार पाण्यात लिंबाचा रस, थोडी साखर, थोडं मीठ हे सगळं घालून याच सरबत सेवन करू शकतो. ज्यामुळे आपली तहान तर भागेलच शिवाय शरीराला थंडावा मिळेल.

८. आंबा : आंबा हे फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. जे की फक्त उन्हाळ्यात च बाजारात येत. यामुळे आपल्याला थंडावा मिळतो. अशाप्रकारे आपण ही फळे सेवन करून निरोगी राहू शकता.

Share.

Leave A Reply