‘माझ्या नव-याची बायको’ फेम रसिका सुनील आणि आदिती द्रविडचा नवा अल्बम ‘यु अँड मी’ रिलीज, तरुणाईला वेड लावेल असा!

0

‘माझ्या नव-याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री रसिका सुनील आणि आदिती द्रविड यांचा ‘यु अँड मी’ हा अल्बम नुकताच रिलीज झाला आहे. स्वतः रसिका आणि आदिती यांनी या अल्बममधील गाणी गायली आहे. या गाण्या दरम्यान रसिका आणि आदिती दोघी भरपूर धमाल करताना दिसत आहे. आदिती आणि रसिका ह्या चांगल्या मैत्रिणी पण आहे

WallpaperUP.com

आदिती द्रविडने या आधी झी टॉकीजसाठी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ हे गाणे लिहिले होते, ती एक अभिनेत्री तसेच गीतकारहि आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवा दरम्यान ‘नमन तुला श्रीगणराया’ हे तिचे गाणे आले होते. आता तिचे ‘यु अँड मी’ हे गाणे रसिकांसमोर येत आहे, हे गाणे सुद्धा आदितीने लिहीले आणि गायलेही आहे. सई-पियुषने या गाण्याला संगीत दिले आहे. फुलवा खामकरने यांनी या गाण्याची नृत्यं रचना केली आहे.

youtube.com

Share.

Leave A Reply