रात्री झोपेत तुम्हाला देखील घाम येत असेल तर तुम्ही ‘या’ गंभीर आजरांचे शिकार झाले आहेत.

0

पंखा, एसी असूनही रात्री झोपेत असताना घाम येत असल्यास हे गंभीर लक्षण आहे. असे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अति घाम येणे हे हायपर थारॉईयडीझम चेही लक्षण आहे. थायरॉईड ग्रंथी चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. या ग्रंथींनी जास्त हार्मोन्स तयार केल्यास शरीराचे तापमान वाढते. तसेच भूक आणि तहान लागते. नाडीचे ठोके वाढतात, थकवा जाणवतो, अतिसार होतो, वजनही कमी होते. लो ब्लड शुगर, स्लिप अ‍ॅप्निया, टीबी, मानसिक ताण, एचआयव्ही, ट्यूमर आदी आजारातही रात्री झोपेत घाम येण्याचे लक्षण दिसून येते.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन घेतल्याने रात्री हायपोग्लेसेमिया म्हणजे लो ब्लड शुगर होऊन रक्तातील ग्लुकोज १४० मिलिपेक्षा कमी असेल, तर घाम येतो. सिल्प अ‍ॅप्निया असेल तर रात्री खूप वेळा श्वास बंद होतो. शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. वारंवार कुस बदलावी लागते. त्यामुळे घाम येतो. प्रोस्टेट कॅन्सर, किडनी कॅन्सर किंवा अंडाशय आणि अंडकोषात ट्युमर असल्यास रात्री घाम येतो. थायरॉईड कॅन्सर आणि पॅनक्रिझ कॅन्सरमध्येही असे होते. टीबीची लागण झाली असल्यास रात्री भरपूर प्रमाणात घाम येतो.

फुफ्फुसांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होत असते. खोकताना छातीत वेदना होतात. खोकताना रक्त बाहेर येते. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. भूक लागत नाही. मानसिक ताण असेल तर दिवसा घाम येतो, तसा रात्रीही येतो. वयोवृद्ध आणि लहान मुले रात्रीची घाबरतात. त्यामुळे त्यांना घाम येतो. एचआयव्हीचा संसर्ग झाला असल्यास लसिका ग्रंथींना सूज, ताप, सांधेदुखी ही लक्षणे दिसून येतात. एचआयव्ही असलेल्या १० पैकी एका रुग्णाला रात्री घाम येतो. वजन घटणे, अतिसार आणि आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घाम येणे अशी लक्षणं असतात.

अधिक घाम येणार्‍यांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी…

1) दररोज थंड पाण्याने अंघोळ करावी.

2) सुती आणि लिननचे कपडे वापरावेत.

3) घामाचे डाग कपड्यांवर पडू नयेत यासाठी अंडरआर्म पॅड वापरावेत.

4) अँटी बॅक्टेरिअल साबणानेच अंघोळ करावी. अशा साबणामुळे त्वचेवर विषाणूंची निर्मिती होत नाही. त्वचेवर विषाणूंची निर्मिती न झाल्यास आपल्या घामाला दुर्गंधी येत नाही.

5) रात्री झोपताना आपल्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना अँटी पर्सिपेरंट लावावे.

6) योगासने, प्राणायाम याद्वारे मनावरचा ताण दूर होतो. मनावरच्या ताणामुळेही अनेकदा घामाचे प्रमाण वाढत असते.

7) घाम अजिबातच येत नसेल किंवा नेहमीपेक्षा खूपच जास्त येत असेल, तर डॉक्टरांचा सल्‍ला घेणे आवश्यक ठरते. याचबरोबर शरीरातून येणार्‍या वासामध्ये बदल झाला असेल, तरीही डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा.

यासंदर्भात त्वचाविकार तज्ज्ञांशी सल्‍ला मसलत करणे योग्य ठरते. हायपर हायड्रोसिस ही व्याधी झालेल्या रुग्णांना त्वचारोगतज्ज्ञ बोटोक्स प्रमाणात घाम येतो अशा लोकांनी उन्हाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यात अशा व्यक्‍तींनी ताजे जेवण घ्यावे व हलका आहार घ्यावा. काकडी, पुदीना, संत्री, टरबुज यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये सोडियम आणि कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए यांचे प्रमाण खूपच अधिक असते. उन्हाळ्यात दही, ताक यांचे सेवन करणे आवश्यक असते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहाते. उन्हाळ्यात अशा व्यक्‍तींनी भरपूर कांदा खावा. कांद्यामध्ये उन्हापासून त्वचेवर होणारे परिणाम रोखले जातात.

टरबूज, कलिंगडे हे पदार्थ खास उन्हाळ्यातील पदार्थ समजले जातात. यामध्ये 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात शरीराला खूपच जास्त घाम येतो. घाम जास्त आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात जास्त उष्मांक (कॅलरी) असलेले पदार्थ खाऊ नयेत. ज्या अन्‍नपदार्थांमध्ये पौष्टिकता भरपूर आहे, असे अन्‍नपदार्थ उन्हाळ्यात आहारात समाविष्ट करावेत. तेलकट आणि मसालेदार पदार्थ उन्हाळ्यात खाणे टाळावेत. तसेच उन्हाळ्यात भरपूर फळे, खावीत, फळांमध्ये 80 टक्के पाणी असते. ज्या लोकांना अधिक घाम येतो अशा लोकांनी, कोबी, फ्लॉवर, कच्चे केळे, डाळिंब, भेंडी, वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश आहारात करावा.

अधिक घाम येण्याबरोबरच घामाला दुर्गंधी येणे हिही आरोग्याची समस्या मानली जाते. बॉडी स्प्रे किंवा डिओड्रंट फवारून तुम्ही काही दिवस वेळ मारून नेऊ शकता. मात्र, नोकरदारांना अशा व्याधीवर तातडीने उपचार करून घेणे योग्य ठरते. तुमच्या घामाला दुर्गंधी येत असेल तर मित्र, सहकारी तुमच्या जवळ येणे टाळू लागतात. तुम्हाला कोणी तुमच्या घामाच्या दुर्गंधीबद्दल बोलत नाहीत, मात्र त्यांचे वर्तन तुम्हाला टाळण्याचे असते. आपल्या घामाला दुर्गंधी येते आहे हे कळाल्यावर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्‍ला घ्या.

Share.

Leave A Reply