पाच वर्षांपूर्वी त्या व्यक्तीने 360 रुपयांना खरेदी केले एक मातीचे भांडे, टूथब्रश ठेवण्यासाठी करत होता उपयोग, पण त्याला माहित नव्हते त्या भांडयाचे सत्य..!

0

डर्बी : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका माणसाला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. जेव्हा त्याला कळले की, त्याच्या बाथरूममध्ये तो टूथब्रश ठेवण्यासाठी वापरत असलेले एक मातीचे भांडे 4 हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी एका सेल मधून ते भांडे खरेदी केले होते आणि तेव्हापासूनच तो त्या भांडयाचा उपयोग टूथब्रश आणि टूथपेस्ट ठेवण्यासाठी करत होता. त्या भांडयाविषयीचे एक सत्य त्याला जुन्या वस्तूंची माहिती असणाऱ्या त्याच्या मित्राने सांगितले. हे सत्य कळल्यानंतर त्या व्यक्तीने ते भांडे विकण्याचा निर्णय घेतला आणि ते भांडे विकण्यापूर्वीच त्याला २ हजार पट जास्त फायदा झाला.

बाथरूममध्ये होते ४ हजार वर्षांपूर्वीचे मातीचे भांडे..  ही गोष्ट आहे डर्बी शहरात राहणाऱ्या कार्ल मार्टिन (वय 49) यांची. त्यांनी पाच वर्षांपूर्वी विलिंग्टन या शहरातील एका सेल मधून मातीचे एक भांडे खरेदी केले होते. ते भांडे त्यांनी फक्त 4 पाउंड म्हणजे 360 रुपयांना विकत घेतले होते. त्या भांडयाच्या चारही बाजूंना प्राण्यांचे चित्र होते. जे फार जुने दिसत होते. भांडे आणल्यानंतर त्यांनी ते बाथरूममध्ये ठेवले आणि टूथब्रश ठेवण्यासाठी स्टॅण्ड म्हणून त्याचा उपयोग करू लागले.  काही आठवड्यांपूर्वीच मार्टिनने एका लिलाव करणाऱ्या संस्थेत काम करायला सुरुवात केली होती. मार्टिनने सांगितले. मला तेथे तसेच काही मातीचे भांडे पाहायला मिळाले जसे एक भांडे माझ्या घरी बाथरूममध्ये होते. त्या भांडयांवरही तसे प्राण्यांचे चित्र होते. जसे माझ्याकडे असलेल्या भांडयावर होते.

thesassyfork.blogspot.com

त्यानंतर मार्टिनने त्याच्याकडे असलेले भांडे तेथील जुन्या वस्तूंचे जाणकार जेम्स ब्रेंचले यांना दाखवले आणि त्याविषयी विचारले. जेम्स ने सांगितले की हे भांडे ईसा पूर्व 1900 या काळातील आहे आणि सिंधू घाटी सभ्यता याच्याशी निगडीत आहे. जेम्सच्या सांगण्यानुसार ते भांडे अफगाणिस्तानचे आहे आणि कांस्य युगातील आहे. विकण्यापूर्वीच २ हजार टक्क्यांचा फायदा..  मार्टिनने सांगितले की, ” माझे हे भांडे 4 हजार वर्ष जुने आहे आणि इसा मसीह यांच्याही जन्माच्या दोन वर्ष आधीचे आहे. तरीसुद्धा मी लिलावात ते विकण्याचा निर्णय घेतला.” मार्टिनने सांगितले मी ब्रिटिश इतिहासाचा अभ्यास केला आहे परंतु माळ जगाच्या इतिहासाबद्दल माहिती नाही. म्हणून मी ते भांडे ओळखू शकलो नाही. मी त्यात दोन टूथपेस्ट आणि तीन टूथब्रश ठेवले.  सध्यातरी मारतींच्या त्या भांडयाचा लिलाव झालेला नाही पण ते भांडे घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांनी आत्तापर्यंत 80 पाउंड (7 हजार रु.) पर्यंत बोली लावलेली आहे. ही किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 2 हजार पट जास्त किंमत आहे.

Share.

Leave A Reply