‘पुलिस अंकल! आप गाड़ी रोकेंगे तो पापा रुक जाएंगे…प्लीज गोली मत मारियेगा’-विवेक तिवारी हत्याकांड

0

‘पुलिस अंकल! आप गाड़ी रोकेंगे तो पापा रुक जाएंगे…प्लीज गोली मत मारियेगा’ अशा आशयाचे पोस्टर्स सध्या लखनौ येथे बहुतांश गाड्यांवर आणि लहान मुलांच्या हातामध्ये, सोशल मीडियावर दिसत आहे. लखनऊ येथे APPLE कंपनीचे रिजिनल मॅनेजर विवेक तिवारी यांची हत्या करण्यात आल्या नंतर संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. विवेक तिवारी यांना 2 मुली आहे. विवेक iphone XS च्या लॉन्चिंग नंतर आपल्या महिला साथीदाराला तिच्या घरी सोडायला जात असताना लखनऊ शहराच्या गोमटी नगर भागात आल्यानंतर लखनऊ पोलीस च्या 2 शिपायांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबायला सांगितले, ते न थांबल्यामुळे त्यांनी तिवारी यांच्या तोंडावर गोळी मारली, त्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिचा अपघात झाला यादरम्यान तिवारी यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

satyodaya.com

Share.

Leave A Reply