‘थग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात अमीर खान आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज एकत्र बघण्यासाठी चाहते आतुर !!

0

2018 या वर्षीचा सर्वात आतुरतेने वाट बघायला लावणारा ‘थग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट ऐतिहासिक, ऍडव्हेंचर आणि ऍक्शन ने भरपूर असा असून, याची कथा विजय कृष्ण आचार्य यांनी लिहिली आहे. हा चित्रपट फिलिप मीडोज टेलरच्या 1839 च्या ‘कफेशन्स ऑफ अ थग’ या कादंबरीवर वर आधारीत आहे, ब्रिटिश काळामध्ये असलेल्या एका गँगवर आधारित आहे, ब्रिटिश साम्राज्याला ते कसे आव्हान देतात आणि त्या भोवती घडणाऱ्या रोमांचक घटना यात चित्रित केल्या आहे. यात मुख्य कलाकार म्हणून अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरीना कैफ आणि फातिमा साना शेख,ब्रिटिश अभिनेता लीलोड ओवेन, जॅकी श्रॉफ हे असतील. वाढत्या चाहत्यांचा उत्साह टिकवण्यासाठी, निर्मात्यांनी गेल्या आठवड्यात नवीन मोशन पोस्टर्स रिलीज केले. यश चोप्रा यांच्या वाढदिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधून हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी चित्रपट गुहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

gujunews.in

Share.

Leave A Reply