‘ठाकरे’नंतर आलाय मनसेसैनिकांचा ‘ठाकरे 2’ वाचा सविस्तर…!

0

मनसेने तयार केलेल्या ‘ठाकरे २’ या व्हिडिओमधून ‘बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना’, असा संदेश देण्यात आला आहे. राज्यभरात आज ‘ठाकरे’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. शिवसेनेचे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे याचं सूपर्ण आयुष्य ‘ठाकरे’ चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. बाळासाहेबांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मात्र, एकीकडे ‘ ठाकरे ‘ चित्रपटाची जोरदार चर्चा असताना, दुसरीकडे मनसैनिकांनी अपलोड केलेला एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मनसेने तयार केलेल्या या खास व्हिडिओमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना’, असा संदेश देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांचे अनेक फोटो दाखवण्यात आले असून, त्या फोटोंशी साधर्म्य दाखवणारे राज ठाकरे यांचे फोटोही दाखवले आहेत. थोडक्यात, ‘राज ठाकरे हेच उद्याचे बाळासाहेब ठाकरे आहेत’, असा संदेश मनसैनिकांनी या व्हिडिओद्वारे दिल्याचं बोललं जात आहे. ‘मनसे सोशल मिडिया अधिकृत’ या अकाउंटवरुन युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.एकीकडे संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाची हवा असताना, आता मनसेचा हा व्हिडिओ ‘ठाकरे २’ नावाने व्हायरल होतो आहे.

instagram.com

आज प्रदर्शित झालेल्या ‘ ठाकरे ‘ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सूत्रांनुसार, पुढील दोन दिवसही मुंबईत ठाकरे चित्रपटाचे जवळपास सर्व शोज हाऊसफुल्ल आहेत. दरम्यान, ठाकरे चित्रपट पाहून आलेल्यांना आता चित्रपटाच्या सिक्वेलची अर्थात ‘भाग २’ ची उत्सुकता आहे. पहिला भाग संपताना शेवटी पडद्यावर To Be Continued… असं लिहून येतं. त्यामुळे पहिल्या भागापाठोपाठ आता ‘ठाकरे २’ देखील येणार हे जवळपास नक्की झाले आहे. मात्र, संजय राऊतांच्या ‘ठाकरे २’ पूर्वीच मनसेने त्यांचा हा स्वतंत्र ‘ठाकरे २’ व्हिडिओ रिलीज केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेलं गाण मूळ ‘ठाकरे’ चित्रपटातलंच आहे. त्यामुळे मनसैनिकांनी राऊत यांना ‘ठाकरे २’ चित्रपट असाच असावा, हे सुचवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बोललं जात आहे. तसंच मनसेचेच असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे खरोखरच राज ठाकरेंवर ठाकरे २ तर काढण्याच्या विचारात नाहीत ना?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, युट्यूबसोबतच फेसबुकरवरही हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होतो आहे. दरम्यान, मनसैनिकांनी तयार केलेला हा व्हिडिओ आणि या व्हिडिओद्वारे बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची केलेली तुलना, एखाद्या नव्या वादाला तोंड फोडणार का? शिवसैनिक या व्हिडिओवर काही प्रतिक्रीया देणार का? हे येणारी वेळच सांगेल.

Share.

Leave A Reply