… तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते माधुरीचे लग्न…!

0

नव्वदच्या दशकामध्ये लाखो प्रेक्षकांची धकधक असणारी अभिनेत्री म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. आज माधुरी ड़ॉ. नेने यांच्यासोबत सुखी संसारात गुंतली असली तरी एके काळी टीम इंडियाच्या खेळाडूवर तिचा जीव जडला होता. आज या खेळाडूचा वाढदिवस आहे. या खेळाडूचे नाव आहे अजय जडेजा.
बॉलिवूडमध्ये माधुरीचे चाहते आहेत. संजय दत्त आणि अनिल कपूर सारख्या अभिनेत्यांसोबतही तिचे नाव जोडले गेले. परंतु माधुरीचे ह्रदय मात्र क्रिकेटच्या मैदानावर षटकार खेचणाऱ्या जडेजाने जिंकले होते. त्या काळी माधुरी आणि जडेजाच्या लव्ह स्टोरीचे किस्से सर्वत्र ऐकले जात होते.

dailyupdate.com

या दोघांची पहिली भेट एका मॅकझीनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती. पहिल्या भेटीपासूनच दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा सुरू झाली होती. त्याकाळी हँडसम अजय जडेजाचेही लाखो दिवाने होते आणि मुली त्याच्यावर फिदा असायच्या. माधुरीसोबत नाव जोडले गेल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशीही चर्चा सुरू झाली. काही चित्रपटांमध्ये त्याने कामही केले.

dailyupdate.com

माधुरी आणि जडेजा लग्न करणार अशाची चर्चा सुरू झाल्या, परंतु याच दरम्यान जडेजाचा फॉर्म हरवला आणि तो मैदानावर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. माधुरीमुळे जडेजाचे क्रिकेटवरून लक्ष उडाल्याची कुरबूर घरात सुरू झाली. जडेजा हा एका रॉयल कुटुंबातील होता तर माधुरी तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात मोडत होती आणि याचमुळे माधुरीला जडेजा कुटुंबाचा नकार होता. त्यामुळे जडेजाने माधुरीपासून लांब राहणे पसंद केले. यानंतर माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला तर जडेजाने जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली हिच्याशी विवाह केला.

Share.

Leave A Reply