सुंदर मूल होण्यासाठी पत्नीने पतीकडे मागितले असे काही…!

0

पती दिसायला साधारण असल्याने पत्नीने त्याच्याकडे सुंदर मूल होण्यासाठी हॅण्डसम पुरुषाचे वीर्य मिळवण्याची मागणी केल्याची धक्कादायक घटना न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. यामुळे खजिल झालेल्या पतीने रेडीट या ऑनलाईनवर आपले मन मोकळे करताना आपबीती सांगितली आहे. पत्नीच्या या विचित्र मागणीबद्दल आपण मित्र व नातेवाईकांनीही काही सांगू शकत नाही अशी खंत त्याने व्यक्त केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पहाटे 4 वाजता पत्नीने झोपेतून आपल्याला उठवले. त्यानंतर तिने तिला सुंदर मूल हवे असल्याचे पतीला सांगितले.

त्याबरोबरच तू दिसायला साधारण आहे. यामुळे तुझ्यापासून सुंदर मूल होणे अशक्य आहे. म्हणून एखाद्या हॅण्डसम पुरुषाचे वीर्य वापरून मी सुंदर मुलाला जन्म घालू इच्छिते. अशी अजब इच्छा पत्नीने त्याच्यासमोर व्यक्त केली. पत्नीचे बोलणे ऐकूण पतीची झोपच उडाली.ccrmivf.com
तिच्या मनात नेमके काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी तिचे एका विवाहीत पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. तेव्हा तिच्या विचित्र मागणी मागचे रहस्य उलगडल्याचे पतीने सोशल साईटवर सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पतीने पत्नीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.

Share.

Leave A Reply