खरंच काय आहे सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या..

0

सुकन्या समृध्दी योजना: रु. 1000 दरमहा भरा आणि 21 वर्षांनंतर 6 लाख मिळवा. फक्त भारतीय नागरिकत्व असलेले कुटुंब या योजने साठी पात्र आहे. या योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय हे 10 वर्षा पेक्षा कमी हवे. मुलीचे आई-वडील किंवा पालक मुलीच्या नावे हे खाते उघडू शकतात. जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे आपण हे खाते उघडू शकतो, मुली जर जुळ्या असतील तर 3 खाते उघडू शकतो. या योजने अंतर्गत जमा केलेले पैसे आणि त्यावर मिळालेले व्याज हे तेव्हाच काढू शकतो जेंव्हा खात्याचा कार्यकाळ हा 21 वर्ष झालेला असेल किंवा मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षानंतर 50% रक्कम काढू शकतो किंवा वयाच्या 18 वर्षानंतर लग्नाच्या वेळेस सर्व रक्कम काढू शकतो. मुलीच्या लग्ना नंतर हे खाते बंद केले जाईल.

GoodMoneying
Share.

Leave A Reply