आपल्या मुलीला मिळणार 4 लाख रुपये अधिक, सरकारने सुकन्या समृद्धी योजने चे व्याजदर वाढवले

0

भारत सरकारच्या नवीन योजने नुसार, सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, त्याचा थेट फायदा आपल्या मुलीला मिळणार आहे.
या स्कीम अंतर्गत आता आपल्या मुलीला 4 लाख रुपये अधिक मिळतील.या आधी या स्कीम अंतर्गत पैसे गुंतवणुकीवर जास्तीत जास्त 65.84 लाख रुपये मिळवले जाऊ शकत होते, तेच आता 69.70 लाख रुपये इतके वाढवून मिळतील. एखादी व्यक्ती आपल्या मुलीच्या नावे हे खाते उघडू शकते. सध्या अस्तित्वात असलेल्या फिक्स डिपॉजिट स्कीम्स पैकी या स्कीम अंतर्गत सर्वाधिक व्याज दिले जाते.

या योजने बद्दल बऱ्याच लोकांना संपूर्ण माहिती नसते, बँकेत संपर्क करून स्कीम चांगली समजून घेतली तर चांगला फायदा होऊ शकतो. कुठल्याही बँकेत तसेच पोस्ट ऑफिस मध्ये हे खाते उघडले जाऊ शकते. या व्यतिरिक्त या योजने अंतर्गत गुंतवणूक केलेल्या पैशावर कलम 80c अंतर्गत इन्कमटॅक्स वर देखील आपण सवलत मिळवू शकतो.

Alamy

Share.

Comments are closed.