बारावी नापास झालो म्हणून अभिनेता ..! वाचा आणखी काय बोलले सुबोध भावे?

0

सुबोध भावे म्हंटल कि सर्वांना त्याच्या हसरा चेहरा समोर येतो. अतिशय उत्कृष्ट असा अभिनेता जो आपल्या कलेने व आपल्या हसऱ्या, मनमोहक स्वभावाने लोकांचे मन जिंकून घेतो. अतिशय प्रेमळ व मनमेळाऊ असणारे सुबोध भावे आपल्या शिक्षणाबद्दल काय बोलतात वाचा पुढे सविस्तर अभिनेता सुबोध भावे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा नुकताच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.सुबोध भावे यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट व छोट्या पडद्यावर मालिका असं सगळीकडून यश मिळत आहे.

mahanews24india.com

तसेच आत्ताचे हे यश मिळण्यापूर्वी सुबोध भावे यांनी अपयश देखील पचवलं आहे. खूप कमी लोकांना माहित असेल कि, सुबोध भावे हे 12वी नापास झाले होते. पण मी तेव्हा नापास झालो नसतो तर मी आज येथे नसतो असे सुबोध भावे अभिमानाने सांगतात. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध भावे सांगतात, जर मी बारावी पास झालो असतो तर, कदाचित बीएससी, बीई करत राहिलो असतो. अभिनयापासून दूर राहिलो असतो . माझं नापास होणं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं होत.

marathimovieworld.com

त्यामुळे मला आता नापास होण्याची भीती नाही आहे. फार फार तर काय होईल नापास होईल, ते तर आधीच झालोय. असे सुबोध भावे म्हणतात. करिअरमध्ये साकारलेल्या बायोपिक्सच्या व्यक्तीरेखेतून खूप काही शिकायला मिळाले. माझ्यातील नापास होण्याची भीती तिथेच मेली. मी नापास झालो म्हणून मला काठावर पास करणारी मंडळी माझ्या आयुष्यात आली; असं सुबोध भावे सांगतात. त्यांच्या जीवनात आता काय चालू आहे, असे विचारल्या नंतर ते सांगतात कि सध्या मी एका चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त आहे.लवकरच तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

cinebuster.in

Share.

Leave A Reply