आत्महत्या करण्यासाठी गेला होता हा व्यक्ती, घडले असे काही की..!

0

ही स्टोरी आहे कर्नाटकात राहणारे आणि मंकी मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ज्योती राज यांची ज्याच्या हातांची पकड एवढी मजबूत आहे की, तो कशाचीही मदत न घेता थेट सरळ असा टेकडीवर किंवा डोंगरावरही सहज चढतो. एवढेच नाही तर तो वर चढताना विविध प्रकारची प्रात्याक्षिकेही करतो. कर्नाटकातील या व्यक्तीचे नाव आहे ज्योती राज. त्यांना मंकी मॅन असे नाव देण्यात आले आहे. ज्योती हे अगदी सरळ सपाट असलेल्या उंच भिंती, डोंगर आणि शिखरांवर कशाचीही मदत न घेता सहज चढतात.

ज्योती यांचे म्हणणे आहे की, एद दिवस निराश होऊन ते एका मोठ्या दगडासमोर उभे होते. त्याठिकाणी उंच टेकडीवरून उडी मारून जीव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.पण त्या टेकडीवर कसे चढायचे हेच त्यांना कळत नव्हते. त्याचवेळी त्याठिकाणी एक माकड आले आणि ते कशाचाही आधार न घेता झटकन त्या टेकडीवर चढले.

divyamarathi.bhaskar.com

ज्योती यांनीही त्या माकडाच्या मागे कशाचाही विचार न करता चढायला सुरुवात केली आणि त्या टेकडीच्या शिखरावर पोहोचूनच ते थांबले. ज्योती यांनी जेव्हा खाली पाहिले तेव्हा लो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. त्यांचे कौतुक केले जात होते. मग काय ज्योती यांनी नवे जीवन मिळाले आणि ज्योती हे डोंगरांच्या दिशेने निघाले.

divyamarathi.bhaskar.com

Share.

Leave A Reply