आपला हरवलेला किंवा चोरी झालेला अँड्रॉइड मोबाईल कसा शोधाल?

0

बऱ्याच वेळेला आपला मोबाईल फोन गर्दीमध्ये चोरीला जातो किंवा कुठेतरी हरवला जातो. अशा वेळेस आपल्याला मोबाईल सोबतच चिंता असते त्या मध्ये असलेल्या डेटा ची. अँड्रॉइड मोबाईल मध्ये ‘Find my Device’ नावाची सुविधा असते ती कशी वापरावी आपण जाणून घेऊया.

खालील काही स्टेप्स, ज्या वापरुन आपण चोरी गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो तसेच आधी पासूनच कुठल्या सेटिंग्स सुरु ठेवाव्या याची पण काळजी आपण घेऊ शकतो.आपण सर्वात पहिले जेंव्हा आपल्या फोन ने गुगल ला आपल्या इमेल द्वारे रजिस्टर करतो तेंव्हा स्वयंचलितपणे ‘Find my Device’ हि सुविधा सुरु होते. ‘Find my Device’  हि सुविधा वापरण्यासाठी आपला मोबाईल सुरु हवा, आपल्या गुगल अकाउंट ला साइन इन हवा, आपला मोबाईल हा मोबाईल डेटा द्वारे किंवा वायफाय द्वारे इंटरनेट ला कनेक्ट हवा, त्याचे लोकेशन ऑन असावे, त्याची Google Play visibility ऑन असावी आणि ‘Find my Device’ हि सुविधा सुरु असावी. ‘Find my Device’ हि सुविधा ऑन करण्यासाठी Setting ->Security & Location(तुम्हाला Security & Location मिळत नसल्यास क्लीक करा Google ->Security) ->आणि ‘Find my Device’ वर क्लिक करून ते ऑन करा. वरील सर्व स्टेप्स बघण्यासाठी गुगल ने “Find my Device app” हे अँप बनवले आहे, Google Play store वर जाऊन तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता.

Google मॅप च्या मदतीने हरवलेला अँड्रॉइड स्मार्टफोन शोधण्यासाठी, आपल्याकडे प्रथम मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक असणे आवश्यक आहे ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी असावी. याव्यतिरिक्त, आपल्याला Gmail खात्याचा ID आणि पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रथम Google वर www.maps.google.co.in लिहा. या नंतर Google मॅप उघडल्यावर, आपल्याला आपल्या गहाळ स्मार्टफोनशी कनेक्ट असलेला Google आयडी प्रविष्ट करावा लागेल. आयडी साइन-इन नंतर, उजवीकडे असलेल्या 3 ठिपक्यांवर क्लिक करा. यानंतर आपल्याला ‘your timeline’ हा पर्याय दिसेल. ‘your timeline’ हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला लोकेशन इतिहास दिसेल त्यावर सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, आपल्याला आपल्या मोबाईल चे स्थान इतिहास कालांतराने दिसू लागेल. अशा प्रकारे आपल्याला आपला हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल सापडेल.

androidcentral.com

Share.

Leave A Reply