कधीच केले नाही लग्न, मरण्यापूर्वी आयुष्यभराची संपूर्ण कमाई गरीब मुलांना केली दान..!

0

अमेरिकेतील सिएटलचे सामाजिक कार्यकर्ते अॅलन नायमन (63) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांनी मरण्यापूर्वी आपली संपत्ती गरीब मुलांना दान करणार असे सांगितले होते. तेच आश्वासन अॅलन पूर्ण करून गेले आहेत. ही रक्कम किती असेल याची कुणाला काहीही माहिती नव्हती. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा कागदपत्रे तपासून पाहिली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई 1.1 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 77 कोटी रुपये दान केले. एवढी मोठी रक्कम अॅलन दान करणार हे त्यांच्या अगदी जवळच्या मित्रांना सुद्धा माहिती नव्हते.

अॅलन यांच्यासोबत काम केलेल्या मॅरी मोनाहन यांनी सांगितल्याप्रमाणे, अॅलन यांचे निधन याच वर्षी जानेवारीत झाले. परंतु, त्यांच्या मृत्यूपत्राचा खुलासा नुकताच झाला. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, संपूर्ण रक्कम गरीब मुलांना दान करण्यात आली आहे. अशी मुले जी आर्थिक आणि शारीरिकरित्या सक्षम नाहीत.foxnews.com

अॅलन एक बँकर होते. त्यांनी सुरुवातीला भरपूर पैसे कमवले. परंतु, सामाजिक कार्यासाठी नोकरी सोडली. 30 वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यानंतर त्यांनी अनाथ आणि आर्थिक कमकुवत असलेल्या मुला-मुलींच्या सेवेत आपले आयुष्य घालवले. मरताना त्यांनी आपल्याकडे असलेले 5 हजार डॉलर दान केले होते. त्यांच्या मृत्यूच्या 10 महिन्यानंतर त्यांचे मृत्यूपत्र समोर आले. तसेच 77 कोटी रुपयांची संपत्ती स्थानिक अनाथाश्रमांमध्ये आणि चिमुकल्यांसाठी लढणाऱ्या संस्थांना दान करण्यात आली.

अॅलन यांच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला त्यांनी बँकिंगमधून आलेल्या पैशातून समाजसेवा केली. यानंतर स्वतःच्या खर्चात काटकसर करून गरीब मुलांची मदत केली. यानंतरही त्यांनी एकाचवेळी 3-3 कामे करून पैसे कमवले आणि समाजसेवेत लावले. खर्च टाळण्यासाठी त्यांनी लग्न किंवा स्वतःचे कुटुंब स्थापित करण्याचा विचार सुद्धा आणला नाही. जगात अशी अनेक मुले-मुली आहेत, ज्यांना आपल्याकडून मदतीची खूप गरज आहे असे ते म्हणायचे.

Share.

Leave A Reply