देशातील 25 कोटी ग्राहकांचे सिमकार्डस् होणार बंद…!

0

आपण एअरटेल, व्होडाफोन किंवा आयडियाचा मोबाईल क्रमांक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या कंपन्यांची मोबाईलसेवा घेणारे ग्राहक त्यांच्या मोबाईल क्रमांकावर कमी रिचार्ज करत असतील तर अशा सुमारे 25 कोटी ग्राहकांचे सिमकार्ड बंद होण्याची शक्यता आहे. व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल या मोबाईलसेवा पुरविणाऱ्या कंपन्या या 25 कोटी ग्राहकांचे 2G मोबाईलसेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. हे सिमकार्ड बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपन्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

याबाबत एक इंग्रजी वृत्तपत्राने सांगितले, की ”एका अहवालानुसार सुमारे 25 कोटी ग्राहक महिन्याला 35 रुपयांपेक्षाही कमी रिचार्ज करत आहेत. त्यामुळे कंपन्यांना याचा मोठा तोटा होत आहे. एअरटेलकडे 10 कोटी तर आयडिया-व्होडाफोनकडे 15 कोटी ग्राहक आहेत.

unnecto.com

हे सर्व ग्राहक महिनाभरात 35 रुपयांपेक्षाही कमी रुपयांचे रिचार्ज करत आहेत. त्यामुळे आयडिया-व्होडाफोन, एअरटेल 35 रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेचे रिचार्ज करणे बंधनकारक केले आहे”.
का घेण्यात येत आहे हा निर्णय ?
या मोबाईलसेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांकडून महिन्याभरात 35 रुपयांचे रिचार्जही केले जात नाही. त्यामुळे कंपनीला फायदा न होता तोटा होता. या सर्व बाबी लक्षात घेता कंपन्यांनी महिन्याला कमीत कमी 35 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करणे अनिवार्य केले आहे.

Share.

Leave A Reply