महाशिवरात्र : चुकूनही वाहू नका ह्या पाच वस्तू शिवलिंगावर..नाहीतर महादेव होतील नाराज..

0

भारतातील सर्व शिवभक्तांना शिवरात्र ची मोठी उत्सुकता असते. ते या दिवसाची वर्षभर वाट बघत असतात. शिवरात्र प्रत्येक शिवभक्त मोठ्या उत्साहात साजरा करतो. या वर्षी हि महाशिवरात्र 4 मार्च रोजी आहे. आणि यासाठी शिवभक्त मी गेल्या आठवड्याभरा पासून तयारीला सुरुवात केलेली आहे.

असं म्हणतात की या दिवशी जर तुम्ही महादेवाची मनोभावे पूजा केली तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात येणारे सर्व भक्त मोठ्या आनंदाने शिवलिंगावर बेल,दही, दूध, पाणी यासारख्या गोष्टी मनोभावे अर्पण करत असतात, पण आपणाला माहिती आहे का की अशा अनेक गोष्टी आपण अनावधानाने शिवलिंगावर अर्पण करतो ज्या शास्त्रामध्ये वर्जित केलेल्या आहेत. या गोष्टी शिवलिंगावर अर्पण करणे चुकीचे आहे अशाच काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपण अनावधानाने कधीतरी वाहतो ती पहिली गोष्ट म्हणजे हळद. खरं बघितलं हळद म्हणजे भगवान विष्णू आणि सौभाग्याचे प्रतिक मानलं जातं. त्यामुळे हळद कधी महादेवाला अर्पण करू नये.

त्यानंतर काही जण महादेवाला अर्पण करतात तुळशीचे पान महादेवाला अर्पण करू नये असे शास्त्रात सांगितले गेले असल्यामुळे तुळशीचे पान कधीही महादेवाला अर्पण करू नये. काही लोक महादेवाला तिळ अर्पण करताना दिसून येतात भगवान विष्णू यांच्या मळापासून तयार झाल्याची आख्यायिका असल्यामुळे तीळही महादेवाला कधीच अर्पण करू नयेत. काही ठिकाणी काहीजण महादेवाला तांदूळ अर्पण करताना दिसून येतात महादेवाला तांदूळ अर्पण करू नयेत अशी अख्यायिका प्रसिद्ध असल्यामुळे महादेवाला कधीच तांदूळ अर्पण करायची चूक करू नये.

Share.

Leave A Reply