लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन…!

0

लागीरं झालं जी या मालिकेतुन घराघरात पोहचलेली शिवानी बावकर ला मालिकेसाठी बक्कळ मानधन मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे. आजकाल चित्रपटांपेक्षा छोट्या पडद्यावरील मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहेत. सध्या मालिकेतील जोडींचे तरुणाई तसेच वयस्कर लोकांनाही आकर्षण आहे. राणा-अंजली किंवा गुरुनाथ-राधिका, प्रत्येक जोडीला लोकांनक भरभरून प्रेम दिले. प्रत्येक जोडीला रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहे. या जोड्या गाजलेल्या असतानाच ‘लागीरं झालं जी‘ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि अस्सल सातारी भाषेतील या मालिकेला लोकांनी डोक्यावर घेतले.

या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. इतर जोड्यांप्रमाणेच या मालिकेतील शीतल-अजिंक्य जोडीनेसुद्धा रसिकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अज्या आणि शीतली च्या प्रेमकथेची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. या मालिकेत शीतल ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी बावकर चे लोक चाहते झाले आहेत.

facebook.com

शिवानी बावकर ही मुळची पुण्याची असून वयाच्या केवळ २५ व्या वर्षी तिला हे यश मिळत आहे. अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी बावकर झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारत मराठी मालिकेत प्रवेश केला होता. उंडगा हा तिचा चित्रपट काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

facebook.com

शिवानी बावकर कमाई:-शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याचे वृत्त आहे. एवढे मानधन मिळणारी ती मालिकेतील एकमेव अभिनेत्री असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा चालु आहे. तुज्यात जीव रंगला मधून प्रसिद्धीस आलेला हार्दिक जोशी म्हणजेच राणादा याला एका दिवसाचे १८-२० हजार रुपये मिळत असल्याची चर्चा होती, परंतु शिवानी बावकर चे मानधन पाहता ती मोठमोठ्या अभिनेत्यांना सुद्धा मागे टाकत  आणल्याचे दिसते.

Share.

Leave A Reply