शेवग्याचे आधुनिक वाण वापरून शेवगा शेतीतून मिळवा लाखोंचा नफा, जाणून घ्या कसे !

0

शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या हलक्‍या, माळरान, डोंगर-उताराच्या जमिनीत करता येते. शेवग्याला मार्च, एप्रिल, मे मध्ये अजिबात पाणी मिळाले नाही तरी हे झाड मरत नाही. कमी पावसाच्या प्रदेशात जून – जुलै मध्ये तर जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये लागवड करावी. शेवगा वानांच्या रोपांची निर्मिती व विक्री हे जोड व्यवसाय करून शेवगा शेती, शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही करू शकतात.

indiamart.com

रोहित – १ या वाणाची निवड करावी, या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यात उत्पादन मिळते. या वाणाला वर्षात दोन बहार येतात. शेंगाचा रंग गर्द हिरवा व लांबी मध्यम प्रतिची दीड ते दोन फूट असते. लागवडीपासून दहा वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. हा बुटका वाण असल्याने शेंगा सहज तोडता येतात. स्वादिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता व निर्यातक्षम गुणधर्म या वैशिष्ट्यांमुळे हे वाण लोकप्रिय झाले आहे. कोकण रुचिरा, पी. के. एम – १ व २ आणि धनराज या शेवग्याच्या सुधारित जाती आहेत. ‘कोकण रुचिरा’ हि जात विद्यापीठाने निवड पद्धतीने विकसित करून कोकणात लागवडीसाठी प्रसारित केली आहे. या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या, मध्यम लांब व शिजण्यास उत्तम असतात. या जातीच्या झाडापासून ३० ते ३५ किलो प्रती झाड शेंगांचे उत्पन्न होते. पी. के. एम १ च्या शेंगा ४५ सें. मी. लांब तर पी. के. एम २ च्या शेंगा १.५ मीटर लांब असतात.

commodityonline.com

लागवड करताना दोन झाडातील अंतर 4 मीटर बाय 4 मीटर किंवा 5 मीटर बाय 5 मीटर ठेवावे. लागवडीसाठी 60 सें.मी. बाय 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी कुजलेले गवत, झाडांची पाने यांचा थर द्यावा. तसेच शेणखत एक घमेले, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व माती या मिश्रणाने खड्डा भरावा. पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. योग्य प्रकारे लागवड, झाडांची निगा तसेच योग्य पाणी व्यवस्थापन केले तर एकरी 3 लाखांपर्यन्त उत्पन्न आपण शेवग्याच्या शेतीद्वारे घेऊ शकतो. कमी खर्च, कमी पाणी आणि जास्त उत्पन्न असं या शेवग्याच्या शेतीचे रहस्य आहे.

thehindu.com

Share.

Leave A Reply