2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडून करतोय शेती, आता आहे 2 कोटींची उलाढाल.

0

आज तरुणांना डॉक्टर, इंजिनीअर आणि मॅनेजमेंटची डिग्री घेऊन चांगली नोकरी, गलेगठ्ठ पगार आणि लक्झरियस लाईफस्टाईल जगण्याची इच्छा असते. शेतकरी होण्याचे स्वप्न शक्यतो कोणीही पाहतांना दिसत नाही. यादरम्यान एका व्यक्तीने वर्षाकाठी 24 लाख रुपयांचे पॅकेज सोडून गावाकडे परतून शेती व्यवसाय निवडला. एक वर्षानंतर या व्यक्तीने एक कृषी कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे. हा व्यक्ती आहे छत्तीसगढ येथील विलासपुर जिल्ह्यातील मेधपर गावातील सचिन काळे, की शेतीसाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे तरुण शेती करण्यास धजावत नाहीत. बहुतांश तरुण शिकून शहरांमध्ये नोकरीला प्राधान्य देतात. या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे काहीतरी नवे करण्याची जिद्द निर्माण झाली.

आजोंबाकडून मिळाली प्रेरणा
शिक्षण घेत असतांना आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट नेहमी सचिन यांना लक्षात राहायची. त्यांच्या आजोबांनी सांगितले होते की, पैशाशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता. मात्र, जेवणाशिवाय क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. किमान स्वत:चे पोट भरण्याइतपत शेतीत पिकविण्याची धमक तुमच्यात असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतात. आजोंबाकडून प्रेरणा घेऊन सचिन यांनी वारसा हक्कात मिळालेली 25 एकर शेतीला नवसंजीवनी दिली.

2 लाख रुपयांची नोकरी सोडून सुरु केली शेती
छत्तीसगढ येथील रहिवासी सचिन यांनी 2013 मध्ये महिन्याकाठी 2 लाख रुपये मिळणारी नोकरी सोडली. ते पुंजलॉयड या कंपनीत कार्यरत होते. वर्षाला 24 लाख रुपये मिळत असतांनाही त्यांनी हिम्मत करून नोकरी सोडली.

divyamarathi.bhaskar.com

25 एकर शेतीपासून शेतीला सुरवात
सचिन काळे यांना वारसा हक्कात मिळालेल्या 25 एकर जमीनीवर शेतीला सुरवात केली. सुरवातीला हंगामी भाज्या आणि पिके घेण्यास सुरवात केली. काही दिवस शेतीवर फोकस केल्यानंतर सचिन यांना शेतमजूरांच्या समस्येशी सामना करावा लागला. शेतमजूरांना जेवढा पैसा बाहेर मिळतो, तितकाच पैसा इथे मिळाल्यास मजूर मिळतील. हा विचार सचिन यांनी केला. हा प्लॅन यशस्वीही झाला. 2014 मध्ये सुरुवात झाली अॅग्रीलाईफ सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेडची, सचिन यांनी काही काळ कॉन्ट्रॅक्टवर शेती केली. त्यानंतर काही संशोधनाअंती त्यांनी 2014 साली स्वत:ची अॅग्रीलाईफ सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टवर शेती करण्यास शेतकऱ्यांना मदत करू लागली. सचिन यांनी व्यवसायिक धोरण आखून शिक्षीतांना नोकऱ्या दिल्या. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षणही दिले. सध्या या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे.

इतर शेतकऱ्यांना दिले प्रोत्साहन
सचिन काळे यांचे स्वप्न खूप मोठे होते. त्यांनी न थांबता शेतमजूरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मागदर्शनानुसार शेती करण्यात आली. हे करीत असतांना सचिन यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी न डगमगता खिशातून पैसे मोडले. एका टप्प्यावर त्यांचे परिश्रमाचे परिणाम दिसायला लागले. यापूर्वी जे शेतकरी वर्षातून एकच पिक घ्यायचे ते आता तीन पिके घेऊ लागले.

divyamarathi.bhaskar.com

सचिन यांची पत्नी पाहते अकाऊंटींगचे काम
व्यवसाय वाढत असतांना सचिन यांनी पत्नी कल्याणीला आपल्यासोबत घेतले. मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतलेल्या कल्याणीने कंपनीचा फायनान्स विभाग सांभाळण्यास सुरवात केली. आता सचिन यांचे स्वप्न आहे की त्यांची कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये यावी.

160 शेतकऱ्यांच्या 200 एकर जमीनीवर शेती
सचिन यांच्या कॉन्ट्रॅक्ट शेतीची संकल्पना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवडू लागली. मग त्या शेतकऱ्यांनीही सचिन यांच्या कंपनीशी करार करू लागले. आतापर्यंत सचिन यांच्या कंपनीशी 160 शेतकऱ्यांनी 200 एकर जमीनीचा करार केला आहे. सचिन म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्यांच्या जमीनी विकत घेऊन फायदा कमवू शकत होतो. मात्र, त्यामुळे एकट्याचाच फायदा झाला असता. आता शेतकऱ्यांचाही फायदा होतो.

वडिलांचे स्वप्न होते डॉक्टर अथवा इंजिनीअर व्हावे
सर्वसामान्य पालकांप्रमाणे सचिन यांनी डॉक्टर अथवा इंजिनीअर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. सचिन यांनी नागपूरच्या इंजिनीअर महाविद्यालयात शिक्षण घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर एमबीए फायनान्स करून अर्थशास्त्रात पीएचडीही केली. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

divyamarathi.bhaskar.com

मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
सचिन यांच्या अथम परिश्रमाची दखल थेट मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली. कारण, सचिन यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देतात शेतकऱ्यांना चांगले पिक घेता यावे, यासाठी ते स्वत: दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर कोणत्या जमीनीत कोणते पिक चांगले येईल, याबद्दल मार्गदर्शनही करतात.

Share.

Leave A Reply