शेविंग क्रीम संपलीये? मग वापरू शकता तुम्ही घरातील आरोग्यवर्धक हे पदार्थ! वाचा सविस्तर..

0

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जनसोबत अस एखादेवेळी तरी होतच.. दाढी करतांना वेळेवर लक्षात येत की शेविंग क्रीम तर संपलीये.. आणि नाईलाजाने आपल्याला बाहेर शेविंग करावी लागते. परंतु आता मात्र हे बदलावं लागेल कारण आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा उपयोग करून घरच्या घरी दाढी करणे शक्य आहे अगदी शेविंग क्रीम संपली असेल तरीही! आपल्या किचन मध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्या की एक उत्तम शेविंग क्रीम च काम करू शकतात. बघा नक्की कोणत्या!

१. कच्चे दूध :
मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी दूध हे असतेच. आणि म्हणूनच न तापवलेलं दूध जर तुम्ही थोडा वेळ चेहऱ्यावर लावून ठेवलंत तर केस अगदी मऊ होतील आणि यामुळे अगदी सहज दाढी होण्यास मदत होईल आणि यामुळे दूध हा एक उत्तम पर्याय आहे.

२. खोबरेल तेल :
जर तुम्ही दाढी करण्यापूर्वी जर काही वेळ अगोदर जर खोबरेल तेलाने मसाज केली तर केस मऊशार होऊन अगदी सहजपणे दाढी करता येईल.

३. बटर :
बटर हे देखील एक उत्तम मॉइश्चरायझर च काम करतो. आणि शिवाय याने कोरडी त्वचा देखील नीट होण्यास मदत होते. आणि कडक केसं अगदी सहज पैकी शेव्ह होतील.

४. केळीची पेस्ट किंवा पपई ची पेस्ट :
मित्रांनो तुम्हाला जर कडक केसांवर फेस करायचा असल्यास तुम्ही केळी ची पेस्ट वापरू शकता तसेच याव्यतिरिक्त तुम्ही पपई ची पेस्ट देखील लावू शकता. पेस्ट लावल्या नंतर पाणी घेऊन हलक्या हाताने मसाज केलात तर अगदी सहजपणे दाढी च्या जागेवर फेस होईल आणि तुम्ही अगदी सहज पणे दाढी करू शकाल.

५. कोरफड :
कोरफड जो की सद्ध्या elhovera या नावाने प्रसिध्द आहे. हे अगदी सहज उपलब्ध होते शिवाय पतंजली किंवा इतर तत्सम कंपनीचे elhovera gel बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही जर याने जर मसाज करून दाढी केलात तर चेहऱ्यावर होणारी जळजळ तर थांबेल शिवाय तुम्हाला अगदी मुलायम दाढी चा अनुभव मिळेल.

Share.

Leave A Reply