शारीरिक संबंधाआधी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी..!

0

अनेक लोक असं मानतात की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंध ठेवल्याने जास्त आनंद मिळतो. पण तज्ज्ञ सांगतात की, हा केवळ एक भ्रम आहे. कारण मद्यसेवन केल्यावर व्यक्तीचे इंद्रिय शांत होतात आणि यामुळे व्यक्तीला आधीच झोप येऊ लागते. अशात शारीरिक संबंधाआधी मद्यसेवन केल्याने केवळ थकवाच जाणवतो असे नाही तर झोपही येते. शुक्राणूंची संख्या कमी होते. जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यावर किंवा प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी होण्याची शक्यता असते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मद्यसेवनामुळे शुक्राणुंवर वाईट प्रभाव पडतो. शुक्राणूंची गुणवत्ता याने खालावली जाते. तसेच यामुळे शुक्राणूंचं संतुलनही बिघडतं.

लैंगिक जीवनाला धोका:- नशेच्या अवस्थेत शारीरिक संबंध ठेवताना अनेकदा लोक अनैसर्गिक गोष्टीही करु लागतात. याने संक्रमण होण्याचा धोका, गर्भधारणा होणे आणि नातं तुटणं या गोष्टीही होऊ शकतात. तसेच आणखी काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. महिलामध्ये मद्यसेवनामुळे मासिक पाळीत अडचणी येऊ शकतात. त्यांच्या हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. त्यासोबतच मद्यसेवनामुळे लिवर खराब होतं आणि याचा पचनक्रियेवर प्रभाव पडतो. म्हणजे एकंदर काय तर जर आरोग्यच चांगलं राहिलं नाही तर तुम्ही लैंगिक जीवनाचा चांगलं आनंद घेऊ शकणार नाही. उत्तेजना कमी होते. जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने गुप्तांगाची उत्तेजना किंवा ताठरता कमी होते. त्याचप्रमाणे महिलेने मद्यसेवन केले असेल तर त्यांनाही परमोच्च आनंद मिळणे कठीण होईल. त्यामुळे दोघेही या गोष्टीचा पुरेसा आनंद घेऊ शकत नाही.

dailyhelth.in

शारीरिक संबंधाआधी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी:- शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये नेहमीच माहितीचा अभाव जाणवतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा लैंगिक जीवनावर फार वाईट प्रभाव पडतो. पण लोकांना याबाबत माहितीच नसते. लैंगिक जीवन हे एका दिवसापूरतं मर्यादित नाहीये, त्यामुळे याबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. खासकरुन महिलांनी लैंगिक जीवनाबाबत नेहमीच सतर्क रहायला हवं. जर महिलांनी याबाबत सतर्कता दाखवली तर लैंगिक जीवन आणखी चांगलं होण्यास मदत होईल. अशाच काही गोष्टी आम्ही सांगत आहोत, ज्या शारीरिक संबंध ठेवण्याआधी टाळायला हव्यात. कारण या गोष्टींचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव पडू शकतो.

जास्त पाणी किंवा मद्यसेवन:- कमी प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने व्यक्तीची कामेच्छा वाढण्यास मदत होते, असं अनेक शोधांमधून समोर आलं आहे. पण अल्कोहोलचं प्रमाण जास्त झालं तर याने उत्तेजना कमी होते. तज्ज्ञ सांगतात की, खासकरुन जास्त मद्यसेवन केल्याने रक्तवाहिन्या पसरट होतात आणि यामुळे परमोच्च आनंद मिळण्यास अडचण येते. तर जास्त पाणी प्यायल्याने लैंगिक क्रिया करण्यास अडचण येऊ शकते.

dailyhelth.in

जड आहार:- शारीरिक संबंध ठेवण्याच्या काही वेळेआधी खूप जास्त जेवण केल्याने झोप येऊ लागते. जास्त खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये इन्सुलिन जास्त रिलीज होतं आणि मेंदूमध्ये सेरोटोनिन व मेलाटोनिन वाढतं. याने झोप लवकर येते आणि त्यामुळे शारीरिक संबंधातील इच्छा कमी होते. अॅंटी-एलर्जिक औषधं:- फिटनेसची काळजी घेणे गरजेचे आहेच. पण शारीरिक संबंध ठेवण्याआधी कोणतंही अॅंटी-एलर्जिक औषध घेऊ नका. कारण याने शरीरातील Mucus कोरडं होतं. या कारणाने गुप्तांगातील ओलावा कमी नाहीसा होतो. याचा थेट प्रभाव लैंगिक क्रियेवर पडतो.

शेविंग करु नका:- शरीराची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. याबाबत महिला अधिक जागरुक असतात. पण शारीरिक संबंध ठेवण्याच्या काही वेळेआधी शेविंग कराल याने तुम्हाला अडचण होऊ शकते. कारण शेव्हिंग केल्यावर त्वचा फार जास्त संवेदनशील होते. जर तुम्हाला शेविंग करायचं असेलच तर दोन-तीन दिवसाआधी करावं. फोरप्लेसाठी फळ-भाज्या:- चॉकलेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी जेली यांसोबत लैंगिक खेळ फार रोमांचक आणि आनंददायी अनुभव ठरु शकतो. पण शारीरिक संबंधानंतर याने तुम्हाला यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो. लुब्रिकंट म्हणून याचा वापर केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.

Share.

Leave A Reply