सुरत येथील हिऱ्याचे व्यापारी सावजी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या 600 कार दिवाळी भेट ! वाचा सविस्तर

0

सूरत चे डायमंड व्यवसायी सावजी ढोलकिया आपल्या कंपनीच्या कर्मचार्यांना उत्कृष्ट भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी देखील, सावजी यांनी आपल्या कर्मचार्यांना उत्कृष्ट भेट दिली आहे, त्यांनी आपल्या कंपनीच्या 600 कामगारांना रेनॉल्ट क्विड हि कार भेट म्हणून दिली आहे. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सने आधीच आपल्या कर्मचार्यांना दिवाळी बोनस म्हणून मारुती सुझुकी सेलेरियो कार भेट दिली आहे. गेल्या वर्षी, दिवाळी हंगामात, कर्मचार्यांना फिएट पुंटो आणि डट्सन ह्या कार बोनस म्हणून देण्यात आल्या होत्या. “आम्ही कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या लॉयल्टी बोनस कार्यक्रमाअंतर्गत जवळजवळ 1700 डायमंड कलाकार आणि हीरा अभियंता यांना प्रोत्साहन देत आहोत” अशी घोषणा सावजी ढोलकिया यांनी त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये केली आहे. कंपनीने असाही दावा केला आहे की एका खास कार्यक्रमामध्ये महिला कर्मचार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कारची चावी देण्यात आली.

chandigarhmetro.com

 

Gaadiwaadi.com

 

motoroids.com

 

theweek.in

Share.

Leave A Reply