सायना नेहवाल लवकरच विवाहबंधनात अडकणार, हा आहे तिचा जोडीदार!

0

भारताची स्टार बॅडमिंटनपटू तसेच जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेली सायना नेहवाल हिच्या लग्नाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. 16 डिसेंबर रोजी ती विवाहबद्ध होणार आहे. तिचा होणार नवरा परूपल्ली कश्यप हा सुद्धा एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटूच आहे. तो जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानी आहे. सायना आणि पारुपल्ली हे मागच्या 10 वर्षांपासून रिलेशन मध्ये आहे परंतु त्यांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली. ते दोघेहि 2005 पासून गोपीचंद अकादमी मध्ये सोबत ट्रेंनिंग करत होते.

BollywoodShaadis.com

लग्नासाठी हीच योग्य वेळ असल्याची सायना म्हणाली, त्यानंतर लगेचच आगामी टूर्नामेंट सुरु होणार आहे, व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे वेळ मिळणार नाही. सायना म्हणाली कि विदेशी दौऱ्यांदरम्यान आम्ही दोघे जवळ आलो. 2007 पासून आमच्या रिलेशनशिप ला सुरुवात झाली. तिने सांगितले की त्यांच्या कुटुंबास कश्यपशी असलेल्या नातेसंबंधाविषयी आधीच माहिती होते आणि ते लग्नाच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहे.

dnaindia.com

Share.

Leave A Reply