या कारणांमुळे रिंकू राजगुरुच्या ‘कागर’ चित्रपटाचे शूटिंग थांबविले..!

0

प्रेरणा महादेव राजगुरु एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तीचे जिजामाता कन्या प्रशाला या (अकलुज : जिल्हा सोलापूर) शाळेमध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकूचे कौतुक होत आहे.

जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल ह्याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तिला अभिनयाची जन्मजातच देणगी असल्याचे या सिनेमातील तिच्या ज्वलंत अभिनयामुळे दिसून येत आहे. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले. तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकूला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.

facebook.com

दोन वर्षांच्या खंडानंतर रिंकुचा चित्रपट येत असल्याने कागरविषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदनं या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

facebook.com

मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कागर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं.

“मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फॅन्सला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आत्ता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.” असं रिंकुनं सांगितलं.

Share.

Leave A Reply