झोपताना कोणत्या दिशेला डोकं असावे आणि कोणत्या दिशेला पाय…!

0

दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास वाढतो मानसिक तणाव, विचार होतात नकारात्मक आणि वारंवार होते झोपमोड झोप आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक क्रिया आहे. झोपण्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार झोपताना डोकं कोणत्या दिशेला ठेवावे आणि पाय कोणत्या दिशेला असावेत या संदर्भात शास्त्रातील काही नियम जाणून घ्या.आपण दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास चुंबकीय ऊर्जा पायांमध्ये प्रवेश करून डोक्यापर्यंत पोहोचते. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि झोपही व्यवस्थित लागत नाही. यामुळे झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत.

 

> दक्षिण दिशेकडे डोकं आणि उत्तर दिशेकडे पाय करून झोपणे उत्तम राहते. अशाप्रकारे झोपल्याने सर्व आजार दूर राहतात.

> वातावरणातही चुंबकीय शक्ती असतात, या शक्ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असतात.

> आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यानंतर ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि पायांकडून बाहेर पडते.

> या क्रियेमुळे जेवण सहजपणे पचते. सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर डोके शांत राहते आणि आपल्याला फ्रेश जाणवते.

divyamarathi.bhaskar.com

ही आहे यमदेवाची दिशा
गरुड पुराणानुसार मृत्यूचे देवता यमदेव दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. या दिशेला यमलोक आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेकडे ठेवले जातात. परंतु जिवंत व्यक्तीसाठी ही स्थिती अशुभ मानण्यात आली आहे. असे झोपल्यामुळे वारंवार झोपमोड आणि भीतीदायक स्वप्न पडण्याची शक्यता राहते.

divyamarathi.bhaskar.com

Share.

Leave A Reply