तनुश्रीने पैसे देऊन मला मारले; गीता-बबीताने घ्यावा माझा बदला – राखी सावंत

0

अभिनेत्री राखी सावंतने नुकतीच हरियाणातील झालेल्या रेसलींग स्पर्धेत उपस्थिती दर्शविली होती. मात्र, या खेळात राखीला दुखापत झाल्याने तिला थेट रुग्णालय गाठावे लागले. या प्रकरणानंतर राखीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राखीने डान्स करण्यास सुरुवात केली असता त्या महिला कुस्तीपटूने तिला खाली आपटले. यामुळे तिच्या कमरेला जबर मार लागला.

timesofindia.indiatimes.com

त्यामुळे तिला बसणे सुद्धा कठिण झाले आहे.राखी सावंतशी ईनाडू इंडियाच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता तिच्यासोबत धोखा झाला असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, मी त्याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी नाहीतर डान्स करण्यासाठी गेली होती. यादरम्यान, माझा विश्वासघात केला. मला माहित नाही त्या महिलेने माझ्यासोबत असे का केले. कदाचित मीटूच्या लोकांनी किंवा तनुश्रीने मला मारण्याचे पैसे दिले असतील. जे काही आहे ते रेसलरच सांगू शकते. डान्स करता-करता तिने मला कधी उचलले आणि कधी खाली आपटले हे मला कळाले नाही. सध्या माझी प्रकृती चांगली होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहे.या प्रकरणानंतर राखीने रेसलरसोबत बदला घेण्याची भावना व्यक्त केली. तसेच रेसलर गीता आणि बबीता फोगाट यांनी माझा बदला रेसलरशी घ्यावा असे आवाहन ही राखीने त्यांना केले आहे.

bollywoodpapa.com

Share.

Leave A Reply