राजस्थान येथे रेल्वे मध्ये पकडले तब्बल 3 क्विंटल इतके चांदी, सोने आणि लाखोंची कॅश ! नेमके काय आहे प्रकरण ?

0

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान येथे एका ट्रेन मधून लाखो रुपयांची कॅश तसेच याव्यतिरिक्त 3 क्विंटल चांदी आणि 2 किलो सोने जप्त करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी एटीएस ने मोठ्या प्रमाणात हवाला कारभाराचा भांडाफोड केला आहे. हि छापेमारी दिल्ली येथून अहमदाबाद कडे जाणाऱ्या आश्रम एक्सप्रेस या ट्रेन मध्ये करण्यात आली. एटीएस ने याबाबत चौकशी सुरु केली आहे. जमा केलेली रक्कम हि जवळपास पन्नास लाख रुपये इतकी आहे. या घटनेबद्दल सांगताना डीआईजी प्रफ्फुल कुमार म्हणाले कि खबऱ्या व्यक्तीकडून टीप मिळाल्यानंतर आम्ही ट्रेन च्या लगेज बोगी ची तलाशी केली त्यात आम्हाला सहा मोठे पॅकेट मिळाले. जेंव्हा त्या पॅकेट्स ना खोलण्यात आले तेंव्हा त्यात मोठ्या प्रमाणात कॅश, सोने आणि चांदी मिळाले. त्यानंतर सर्व सामानाला जप्त करण्यात आले. ट्रेन अहमदाबाद येथे जात असल्यामुळे एटीएस टीम अहमदाबाद येथेही नजर ठेऊन आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे कि ह्या सर्व प्रकारात नेमके कोण कोण सामील आहे.

itznewz_com

Share.

Leave A Reply