पुणे येथे एका आंतरराष्ट्रीय शाळेतील पिटी च्या शिक्षकाने केले चार विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण ! शिक्षकाला अटक

0

पुणे येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील 4 विद्यार्थ्यांनी आपल्या पिटी च्या शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी सांगितले कि त्याच्या घरी बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत या शिक्षकाने छेडछाड केली आहे. या सर्व मुलांचे वय हे 15 वर्ष इतके आहे. या प्रकरणात चौकशी करत असलेल्या पोलिसांनी सांगितले कि या शिक्षकाने या विध्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर मुलांच्या आई वडिलांनी त्यांना या शिक्षकाकडे ट्रेनिंग साठी ठेवले होते. जेंव्हा आरोपीला मुले एकटे सापडत असे तेंव्हा तो लैंगिक शोषणाचा प्रयत्न करत असे, या सगळ्याला कंटाळून विद्यार्थ्यांनी आप-आपले अनुभव एकमेकांना सांगितले आणि या शिक्षकाला शिक्षा देण्याचे ठरवले.

nharrowhead.com

या विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्याने त्यांच्या सोबत घडत असलेल्या लैंगिक शोषणाविषयी आपल्या आई-वडिलांना सांगितले. कसा हा शिक्षक मेडिकल ट्रेनिंग च्या नावाखाली त्यांचे शोषण करतो व तो चुकीच्या अंगांना स्पर्श करतो असे त्याने सांगितले. यानंतर त्याच्या आई वडिलांनी इतर विध्यार्थ्यांच्या घरी संपर्क केला आणि त्या शिक्षकाची पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिक्षकाला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुलांनी यावेळी सांगितले कि आम्ही जेंव्हा छेडछाडीचा विरोध करत असू तेंव्हा शिक्षक आम्हाला शाळेतून काढून टाकण्याची तसेच सार्वजनिक बदनामी करण्याची धमकी देत असे.

lorecreative.co.uk

 

Share.

Leave A Reply