फक्त 5000 रुपये सिक्‍युरिटी डिपॉझिट भरुन घेऊ शकता पोस्‍टाची फ्रेंचायसी

0

भारतात ९० टक्के पोस्‍ट ऑफिस हे ग्रामीण भागात आहेत.असे असूनही बऱ्याच ठिकाणी अजुनही पोस्ट ऑफिसची कमतरता भासते आहे. ही गरज ओळखून पोस्ट विभागाने लोकांना पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ 5000 रुपयांचे सिक्‍युरिटी डिपॉझिट भरुन तुम्ही ही फ्रेंचायसी घेऊ शकता.

इंडिया पोस्ट फ्रेंचायसी स्कीम अंतर्गत पोस्ट ऑफिसची काउंटर सर्विस पोस्ट ऑफिसच्या बाहेर उपलब्ध होणार आहे. या फ्रेंचायसीच्या वस्तूंची डिलिव्हरी आणि ट्रान्समिशन पोस्ट विभागच करतो. या स्कीम अंतर्गत लोकांपर्यंत पोस्ट ऑफिसची सेवा आणि प्रॉडक्टस पोहचतात. फ्रेंचायसी घेणाऱ्यास या निमित्ताने चांगली कमाई करण्याची संधी मिळते. अर्ज आणि इतर माहितीसाठी इंडिया पोस्ट च्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Share.

Leave A Reply