शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या नवीन फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. सविस्तर वाचा!

0

जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता पात्र ठरले नाही, अशा शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने माजी कृषिमंत्री कै.पांडुरंग फुंडकर फळ लागवड योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी 100 कोटी इतका निधी राखीव ठेवण्यात आला आहे, दुसऱ्या वर्षी 160 तर तिसऱ्या वर्षी 200 कोटी व पुढील प्रत्येक वर्षी 200 कोटी इतका खर्च राज्यशासनाने निर्धारित केला आहे.

Pinterest.com

दरवर्षी मे ते नोव्हेंबर या कालावधी फळबाग लागवड केली जाऊ शकते. तीन वर्षाच्या कालावधीत दरवर्षी 50, 30 आणि 20 टक्के असे अनुदान ठेवण्यात आले आहे, म्हणजेच शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी लावलेली फळझाडे हि किमान 80 टक्के जगवले तर त्यांना पुढच्या वर्षीचे अनुदान मिळेल तर दुसऱ्या वर्षी लावलेली फळझाडे हि 90 टक्के जागविले तर तिसऱ्या वर्षीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेअंतर्गत 6 हेक्टर इतक्या क्षेत्रावर शेतकऱ्यांना फळबाग लागवड करता येणार आहे. या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे.

youtube.com

योजनेत सहभागी होण्यासाठी चा अर्ज राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या योजनेच्या अधिक महितीसाठी व योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Share.

Leave A Reply