अखेर पेट्रोल झाले स्वस्त! पेट्रोल चे दर 5 रुपयांनी कमी

0

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पेट्रोल दरकपात जाहीर केली एक्साइज डूटीमध्ये 1.50 रुपयाची सवलत जाहीर केली आणि तेल विपणन कंपन्यांकडून आणखी एक रुपयाची कपात करण्यात आली, दोन्ही मिळून 2.50 रुपये इतकी कपात केंद्राकडून करण्यात आली तसेच, केंद्र सरकारकडून कपात जाहिर करताना अरुण जेटली यांनी राज्य सरकारांना 2.50 रुपये कपात करण्याचं आवाहन केले त्यामुळे नागरिकांना पेट्रोल दरामध्ये कमीत कमी 5 रुपयाची सवलत मिळेल. जेटलींच्या या आवाहनाला महाराष्ट्र सरकारचा तात्काळ प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारकडून पेट्रोलमध्ये 2.50 रुपयांची कपात करण्यात आली, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर शिक्कामोर्तब केले.

thehindu.com

डिझेल च्या भावात कुठलाही बदल करण्यात आला नाही. यावर काँग्रेस ने प्रतिक्रिया दिली कि “लोकांचा झालेला संताप बघून हि बीजेपी सरकारने घाबरून दिलेली एक प्रतिक्रिया आहे”. यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले कि आधी केंद्र सरकारने 10 रुपये इतकी एक्साइज डूटी वाढवली आणि आत्ता त्यांनी ती 2.50 रुपयांनी कमी केली, हे हास्यास्पद आहे, सरकारने कमीत कमी 10 रुपये इतकी एक्साइज डूटी कमी करायला पाहिजे होती असे ते म्हणाले.

DriveSpark.com

Share.

Leave A Reply