अशा प्रकारे होत आहे पेट्रोल पंपांवर तुमची लूट…सुप्रीम कोर्टाने दिले कार्यवाहीचे आदेश..

0

पेट्रोल पंपांवर सुरु असलेल्या लूटमारी वर कार्यवाही होण्यासाठी एका सामान्य ग्राहकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि केंद्र सरकारला याबाबत त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्याने पेट्रोल पंपांवर मायक्रोचिप टाकून कशी लूटमार केली जाते याबद्दल हा खटला दाखल केला आहे.

पेट्रोल पंपांवर लोकांकडून पैसे तर पूर्ण घेतले जातात, परंतु चलाखी ने तेल कमी दिले जाते. अशा प्रकारे पेट्रोलपंपधारक लाखो रुपये कमावतात. उत्तर प्रदेश येथे बऱ्याच पेट्रोल पंपांवर चिप च्या माध्यमातून तेल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहे. आपल्याला अशा प्रकारच्या चोरी पासून वाचायचे असेल तर नेहमी पुढील गोष्टींवर लक्ष ठेवा. तुम्ही मीटर रिडींग कडे बघत बसाल तर तुम्ही फसले जाल:- समजा तुम्ही ५०० रुपयाचे पेट्रोल भरत आहात, ५०० चे पेट्रोल भरण्यासाठी जवळ जवळ १ मिनटं वेळ लागतो, अशावेळेस तुमचे सर्व लक्ष रिडींग कडे असेल आणि यादरम्यान १० सेकंदासाठी सुद्धा स्विच ऑफ केले तर तुमच्या ५०० रुपयामधून ५० ते ९० रुपया पर्यंतचे पेट्रोल कमी टाकले जाते.

india.com

ज्या पेट्रोल पंपावर मीटर जलद गतीने चालत असेल तर समजून घ्या कि इथे काहीतरी गडबड आहे. चिप च्या माध्यमातून पेट्रोल पॅम्पमालक मीटर सोबत छेडछाड करतात. नेहमी लक्षात असुद्या कि डिजिटल मीटर असणाऱ्या पेट्रोल पंपांवरच पेट्रोल भरा. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे गाडी रिझर्व्ह वर येण्या आधीच पेट्रोल भरा. बऱ्याच लोकांना माहीत नाही कि रिकाम्या टाकीत पेट्रोल भरल्याने आपले नुकसान होते. यामागचा तर्क असा आहे कि ज्यावेळेस आपली गाडी रिझर्व्ह वर येते तेंव्हा टाकी रिकामी असते, जेवढी टाकी रिकामी म्हणजे तेवढी त्यामध्ये हवा जास्त अशा अवस्थेत जर आपण पेट्रोल भरत असाल तर आपल्याला कमी पेट्रोल मिळेल. सुप्रीम कोर्टाने या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

Share.

Leave A Reply