अवघ्या 4 तासांत मिळणार पॅनकार्ड…!

0

आर्थिक कामांसाठी अत्यावश्यक असलेल्या पॅन कार्डसाठी आता १५ दिवस वाट पाहावी लागणार नाही. अर्ज केल्यानंतर अवघ्या चार तासांत पॅन कार्ड मिळू शकणार आहे, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने ही माहिती दिली आहे. आयकर विभागाकडे अर्ज केल्यानंतर पॅन कार्डला १५ दिवसांचा कालावधी लागतो. सर्वसामान्य नागरिकांना लवकर पॅन कार्ड मिळावे यासाठी सीबीडीटीने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली आहे. आयकर विभागात एक नवी प्रणाली (सिस्टीम) कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे अवघ्या ४ तासात पॅन कार्ड मिळू शकणार आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिलीय. ही नवी प्रणाली सुरू करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र अवघ्या चार तासात ई-पॅन कार्ड मिळू शकणार आहे. केवळ आधार कार्डची कॉपी दिल्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीला चार तासांत पॅन कार्ड मिळणार आहे, असे सुशील चंद्रा म्हणाले. आयकर रिटर्न न भरणाऱ्या आणि संपत्तीत तफावत दाखवणाऱ्या २ कोटी लोकांना आयकर विभागाने एसएमएस पाठवले आहे. तसेच देशात आयकर रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असेही सुशील चंद्रा यांनी यावेळी सांगितले.

indiamart.com

आयकर रिटर्नमध्ये 50% वाढ – नोटबंदीचा परिणाम:- चंद्रा यांनी सांगितले की, 2018-19 या निर्धारीत वर्षात आयकर रिटर्न (आयटीआर) मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमांतर्गत ही माहिती देत चंद्रा यांनी सांगितले की, नोटबंदीचा परिणाम आहे. ते म्हणाले की देशातील कर क्षेत्र वाढविण्यासाठी नोटबंदी अतिशय फायदेशीर होती.

wikipedia.com

आम्हाला यावर्षी 6.08 कोटी आयटीआर मिळाला आहेत. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळालेल्या आयटीआर पेक्षा 50 टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षादरम्यान महसूल विभाग 11.5 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा करण्याचा एक उद्देश साध्य करण्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चंद्रा म्हणाले की, ‘आमचा एकूण थेट करामध्ये 16.5 टक्के आणि निव्वळ थेट करामध्ये 14.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे हे साफ होते की, नोटबंदीची कर वाढविण्याची मदत झाली आहे.’ ते म्हणाले की, ” आतापर्यंत एकूण प्रत्यक्ष करवसुलीचा अर्थसंकल्पीय अंदाज 48 टक्के आहे.” त्यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे कॉर्पोरेट करदात्यांची संख्या गेल्यावर्षीच्या सात लाखाच्या तुलनेत वाढून आठ लाखापर्यंत झाली आहे.

Share.

Leave A Reply