केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केला नवा पराक्रम !! जाणून घ्या सविस्तर..

0

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक भीमपराक्रम करत एक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे!अनेक तज्ञांनी अशक्य असल्याचं सांगितलेली वाराणसी ते कोलकाता गंगा नदीतील व्यावसायिक जलवाहतूक नितीन गडकरी यांनी यशस्वीरीत्या सुरू करुन दाखवली आहे.देशाच्या स्वातंत्र्यांनतर पहिल्यांदाच देशांतर्गत जलवाहतूक सुरू होऊन पेप्सीको कंपनीचे १६ कंटेनर गंगा नदीतून, कोलकात्याहून वाराणसीला येत आहेत. एवढंच नाही तर जहाज १२ नोव्हेंबर रोजी वाराणसीत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील तेथे उपस्थित असणार आहेत.

varanasiguru.com

हे जहाज २८ ऑक्टोबर रोजी वाराणसीच्या दिशेने निघालं असून कोलकाता ते वाराणसी हे जलमार्गाचं १ हजार ३९० किलोमीटर अंतर ते पार करणार आहे! नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या सहाय्याने वाराणसी येथील टर्मिनलही कमीत कमी रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण करून घेतला आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत जलवाहतुकीला एक निश्चित दिशा तर मिळाली आहेच पण इंधन बचतीसह अंतर्गत रस्त्यांवरील अवजड वाहतुकीचा ताण देखील भविष्यात भरपूर कमी होणार आहे. courtsey:-Whatsapp

theyouth.in

 

Share.

Leave A Reply