निफाडला बर्फ कसा? एवढ्या थंडीचे कारण काय… जाणून घ्या.!

0

निफाडला एवढी थंडी का? याचं उत्तर शोधायला मी जरा गुगल अर्थवरून निफाड परिसरात चक्कर मारली. हिरवागार प्रदेश, २ नद्या. निफाडमधून जाणारी कादवा नदी, एका बाजूला असलेली गोदावरी, त्यामुळे थंड हवामान साहजिक आहे. नदीच्या किनारी असलेल्या गावांमध्ये थंडी जास्त असते. पण अजून काही शास्त्रीय कारणे आहेत.

———————————————-

निफाडमध्ये द्राक्षबागा, ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. नद्या-कालव्यांमुळे सतत राहणारा पाणीसाठा, पाणथळ जमीन अशी वरवरची अनेक तापमानातील घसरणीमागे असल्याचे बोलले जाते. तथापि, यानिमित्ताने अन्य अनेक कारणेही पुढे आली आहेत. निफाड तालुक्याचा भूभाग हा समुद्रसपाटीपासून अत्यंत कमी उंचीवर आहे. या भागात उंच डोंगर नाहीत. निफाडमधील समतल भागावर हवेची घनता सर्वाधिक आढळून येते.

tv9marathi.com

सरळ वाहणार्‍या हवेचा थर या खोलगट भागात साठून राहतो. अधिक घनतेची हवा जास्त दाबाचा पट्टा तयार करते. जास्त दाबाचा भाग म्हणजे कमी तापमान असे सूत्र मानले जाते. परिणामी, नाशिकमध्ये निफाडचे तापमान नेहमी नीचांकी नोंदविली जाते.

या व्यतिरिक्त निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. द्राक्षे, ऊस, कांदा, गहू, डाळिंब या पिकांचे अधिक प्रमाण निफाडमध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाडमध्ये दिवाळीनंतरच्या रब्बी हंगामातील गहूदेखील उत्तम पिकतो. निफाडमध्ये वार्‍याची गतीदेखील कमी आढळते, जी तापमान कमी ठेवण्यास पूरक व महत्त्वाचा भाग ठरते. हा वेग फक्त चार ते पाच किमी प्रतितास असा आहे.

tv9marathi.in

पूर्वीपासून मुबलक पाणीसाठा असलेल्या निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. गोदावरी, कादवा, बाणगंगा या मुख्य नद्यांबरोबरच कालव्यांच्या सिंचनामुळे जमिनीत मोठा पाणीसाठा होतो. तो जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो. परिणामी, हवेचे तापमानदेखील घटते. आकाश निरभ्र असल्याने दिवसा जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचे तापमान वेगाने घटते. त्यातूनच थंडी वाढते, अशी अनेक महत्त्वाची कारणे आहेत. Courtsey : WhatsApp

Share.

Leave A Reply