दुबईतल्या अब्जाधीशाने या अभिनेत्रीला दिली आपल्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर;

0

त्या कुत्र्याला धडा शिकवणार असल्याची अभिनेत्रीची पोस्ट. दुबईतील एका अब्जाधीशाने मल्याळम अभिनेत्री नेहा सक्सेनाला आपल्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. त्यामुळे संतापलेल्या नेहाने या अब्जाधीशाने आपल्या पीआरसोबत केलेले व्हॉट्सअॅप संभाषण सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच या अब्जाधीशाची तुलना कुत्र्यासोबत केली आहे. या कुत्र्याला आपण धडा शिकवणारच असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.नेहा सक्सेना ही मल्याळम चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दुबईतील एका अब्जाधीशाने नेहाच्या पीआरला व्हॉट्सअॅपवरून थेट प्रश्न विचारला की,

“ही अभिनेत्री दुबईत माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी उपलब्ध होईल का?” त्यानंतर नेहाने या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रिन शॉट काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तो चॅट जशास तसा पोस्ट करून नेहाने त्या अब्जाधीशाची तुलना कुत्र्यासोबत केली आहे. ज्या पद्धतीने तो महिलांबद्दल बोलतो, त्याला प्रसिद्धी मिळायलाच हवी.

mirchi9.com

या कुत्र्याला आपण धडा शिकवणारच असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. नेहाने त्या अब्जाधीशाचा मोबाईल नंबर सुद्धा पोस्ट केला असून लोकांना त्या आधारे त्याची ओळख पटवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन तिने केले आहे.

newsx.com

विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना अशा वृत्तीचे लोक भेटतात. परंतु बऱ्याचवेळा लोक समोर येऊन अशा वृत्तीच्या लोकांचा भंडाफोड करत नाहीत. सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रींसह आपण एक महिला आहोत आणि अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवायलाच हवी. अशा कुत्र्यांना समाजातून बहिष्कृत करायला हवे, असेही तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

Share.

Leave A Reply