नारळ पाणी प्या आणि ह्या सर्व समस्या विसरा, नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घ्या !

0

नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतात. ह्याच कारणामुळे नारळ पाणी आरोग्याकरिता उपयुक्त असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाण्यात कोलेस्टेरॉल नसते आणि ह्याच गुणधर्मामुळे शरीरावरील चरबी कमी कारण्याकरता नारळ पाण्याचा उपयोग अतिशय उपयुक्त मानला जातो. अनेक आजारांमध्ये नारळ पाण्याला अतिशय महत्व दिलेले आहे. रोज १ नारळ पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट (पाणीयुक्त) ठेवण्याकरता मदत करते तसेच ग्लुकोज ची कमी देखील नारळ पाणी पूर्ण करते. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याकरता नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. नारळ पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी, पोटेशियम आणि मॅग्नेशिअम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.

area-info.net

वाढत्या तापमानात शरीराची ऊर्जास्तर खूप खालावला जातो यामुळे इम्यून सिस्टम कमजोर होते. नारळ पाण्याने शरीराचे तापमान थंड ठेवून ऊर्जा लेवल वाढवली जाते. मेटाबॉलिज्म मध्ये वाढ झाल्यानंतर शरीरात फ्री रेडिकल्स तयार होतात ज्यामुळे व्यक्तींमध्ये तणाव वाढला जातो. नारळ पाण्यात उपलब्ध असलेले एंटीऑक्सिडेंट्स ह्या फ्री रॅडिकल्स ला दूर करण्याकरता मदत करतात. एक संशोधनानुसार नारळ पाणी रक्तातील शुगर लेवल स्थिर करते. इन्सुलिनच्या कमीमुळे डायबेटिज चा त्रास वाढला जातो. नारळ पाणी इन्सुलिन चे प्रमाण वाढवण्याकरता मदत करते. किडनीच्या रोग्यांना हलके व पाणी युक्त पदार्थ खाण्याकरता डॉक्टर सल्ला देतात आणि नारळ पाणी किडनी स्टोन विरघळवण्यास मदत करते. उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात डाग, पिंपल्स त्वचा काळवंडने इ. या सर्व समस्यांकरता नारळ पाणी अतिशय उपयुक्त मानले जाते.

beveragedaily.com

नारळ पाणी आणि नारळातील कोवळा गर फेस पॅक म्हणून देखील वापरला जातो. या गराच्या नियमित वापराने पिंपल्स तसेच त्वचेच्या विविध रोगांवर नियंत्रण मिळवता येते. नारळ पाणी पिण्याची सर्वात योग्य वेळ हि सकाळी असते. उपाशी पोटी नारळ पाण्याचे सेवन अतिशय उपयुक्त असते. याशिवाय व्यायामानंतर, दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या वेळी नारळ पाणी पिण्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते.

rebootwithjoe.com

Share.

Leave A Reply