मुंबई ते गोवा क्रूज सेवा 24 ऑक्टोबर पासून सुरु होणार, अवघ्या 7 ते 12 हजारात क्रूज चा आनंद घ्या!

0

समुद्र सफरीची इच्छा असणाऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. मुंबई ते गोवा क्रूज सेवेचा आनंद घेण्यासाठी आता जास्त वाट बघावी लागणार नाही. 24 ऑक्टोबर पासून हि सेवा सामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर रोजीच ह्या सेवेचा शुभारंभ होणार होता परंतु खराब हवामानामुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली.12 ऑक्टोबर रोजी केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सेवेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.

boatgoa.com

मुंबई-गोवा क्रूझ सेवेची बुकिंग सुरू झाली आहे. या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी, आपण http://angriyacruises.com या संकेतस्थळावरून वरुन तिकिट बुकिंग करू शकतात. या सेवेचा एक भाग 7 हजार ते 12 हजार रुपयांदरम्यान असेल. वेगवेगळ्या डेकसाठी वेगवेगळे भाडे असेल. बऱ्याच वेळेला महागड्या क्रूज प्रवासामुळे या सेवेचा आनंद घेता येत नाही. परंतु मुंबई-गोवा क्रूज सेवेमुळे ते शक्य होणार आहे, आणि त्यात अधिक भर पडली ती लोकप्रिय असलेल्या गोव्याची, त्यामुळे प्रवाशांसाठी हि सफर नक्कीच अविस्मरणीय ठरणार हे नक्की.

india.com

Share.

Leave A Reply