सरकारचे भरभरून ‘दिवाळी गिफ्ट’, योजने बद्दल जाणून घ्या सविस्तर आणि फायदा करून घ्या !

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु केली. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अवघ्या 59 मिनिटांत 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली. दिल्ली येथील विज्ञानभवनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) च्या सपोर्ट कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी 12 योजनांना सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कमी वेळात कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. यामुळे या क्षेत्रात भरपूर रोजगार निर्माण होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लघु उद्योगांसाठी 12 नवे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. हे या क्षेत्रासाठी दिवाळी गिफ्ट आहे असे ते यावेळी म्हणाले. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांवरील व्याजावर २ टक्के सवलत सुद्धा मिळणार आहे.

India.com

या कार्यक्रमाप्रसंगी मोदी म्हणाले के ईज ऑफ डुईंग बिजनेस च्या रँकिंग मध्ये भारत लवकरच 50 व्या स्थानावर येणार आहे. सध्या भारताचे स्थान 77 वे आहे. आमचे सरकार येण्या आधी भारत हा 142 व्या स्थानावर होता असे ते म्हणाले. या कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरु केले आहे. कर्ज घेण्यासाठी psbloansin59minutes.com या संकेतस्थळाला भेट देऊन फॉर्म भरा, येथे आपले नाव, इमेल आयडी, फोन नंबर भरून एक OTP क्रमांकांमार्फत रजिस्टर करावे लागेल. यानंतर कर्जाची पुढील प्रक्रिया होईल.

helpfullinvesting.com

Share.

Leave A Reply