आपल्या आईसारख्याच दिसतात ‘या’ अभिनेत्री..! वाचा सविस्तर

0

इंडस्ट्रीत बॉलिवूड किड्सची चर्चा होत असते. मग, ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर असो किंवा अमृता सिंहची मुलगी सारा अली खान असो. अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या आईसारख्या दिसतात. सारा अली खानचे उदाहरण देता येईल. सारा तिची आई अमृता सिंहसारखी हुबेहुब दिसते. बॉलिवूड टाऊनमध्ये सारा अली खान, सोहा अली खान आणि श्रद्धा कपूरसारख्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या आईसारख्या दिसतात.

india.com

श्रीदेवी आणि जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. ‘धडक’मध्येही जान्हवी श्रीदेवी यांच्यासारखीच दिसली होती. जान्हवीचा चेहरा श्रीदेवी यांच्याशी मिळताजुळता आहे.

asianage.com

सारा अली खान आणि अमृता सिंह सारा अली खान लवकरच ‘सिम्बा’ आणि ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री करत आहे. साराला तिची आई अमृता सिंहची डुप्लीकेट म्हटलं जातं. साराची लोकप्रियता इतकी आहे की, तिचा पहिलाच चित्रपट रिलीज होण्याआधीच इन्स्टाग्रामवर तिचे ५ लाख फॉलोअर्स आहेत.

newsxind.com

सुहाना खान आणि गौरी खानसोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड स्टार डॉटर सुहाना खानची चर्चा होत असते. मग, तिचा फोटोशूट असो किंवा चित्रपटात पदार्पण. कधी बिकिनी फोटोज तर कधी व्हेकेशन फोटोज. या गोष्टींबद्दल ती सोशल मीडियावर चर्चेत असते. जर सुहाना खानला तिची आई गौरी खानसोबत पाहिलं तर त्या दोघींमध्ये फरक दिसत नाही. सुहाना आपल्या आईसारखी दिसते.

dnaindia.com

सोहा अली खान आणि शर्मिला टॅगोर २००४ मध्ये ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी प्रेक्षकांना ती ‘कश्मीर की कली’ चित्रपटातील सुंदर अभिनेत्री शर्मिला टॅगोरची आठवण झाली होती. सोहा अली खान देखील शर्मिला टॅगोर यांच्यासारखी दिसते.

indiatvnews.com

श्रुती हसन आणि सारिका हसन
सुंदर अभिनेत्री सारिका हसन ही कमल हसन यांची पत्नी आहे. आणि त्यांच्या मुलीचे नाव श्रुती हसन आहे. श्रुतीने आपल्या वडिलांसोबत ‘हे राम’ चित्रपटातून आपल्या करिअरचा प्रारंभ केला होता. श्रुती हसनचा चेहरा देखील सारिकाशी मिळता-जुळता आहे.

socialnews.xyz

अनन्या पांडे आणि भावना पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच टायगर श्रॉफसोबत करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडेंट ऑफ द ईअर’मधून आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात करणार आहे. अनन्याचाही चेहरा हूबेहूब आपल्या आईसारखा आहे.

marathi.tv

श्रद्धा कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे श्रद्धा कपूर एक नव्हे तर दोन अभिनेत्रींसारखी दिसते, असे म्हटले जाते. एक तिची आई आणि शिवांगी कोल्हापुरे आणि दुसरी तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे. फॅमिलीतही तिचा पद्मिनी कोल्हापुरेशी मिळताजुळता चेहरा असल्याचे म्हटले जाते. श्रध्दाचे वडिल शक्ती कपूर प्रसिध्द अभिनेते आहेत. परंतु, तिची आई शिवांगी चित्रपटांपासून दूर आहे.

kalingatv.com

ईशा देओल आणि हेमा मालिनी ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीच्या मनमोहक अदाकारी सर्वांना परिचित आहे. ज्यावेळी त्यांची मुलगी ईशा देओल चित्रपट इंडस्ट्रीत आली, त्यावेळी ती दिसायला हूबेहूब हेमा मालिनी यांच्यासारखी दिसायची. अभिनयात ती आपल्या आईची बरोबरी करू शकली नाही. ती आपल्या आईसारखीच दिसते.

mid-day.com

दीपिका पादुकोण आणि उज्जला पादुकोण बॉलिवूड ते हॉलिवूपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री नुकताच रणवीर सिंहसोबत विवाहबंधनात अडकली आहे. दीपिका तिची आई उज्जला यांच्यासारखीच दिसायला सुंदर आहे.

tellychakkar.com

आलिया भट्ट आणि सोनी राजदान अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांना एकत्र पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, त्या दोघी हुबेहुब दिसतात. सोनी यांनी महेश भट्ट यांच्याशी १९८६ मध्ये लग्न केलं होतं. १९९३ मध्ये आलियाचा जन्म झाला.

Share.

Leave A Reply