विविध रोगांपासून दूर ठेवणारे ‘Morning walk’ म्हणजेच सकाळी चालण्याचे आरोग्यदायी फायदे !

0

10 ते 20 मिनिटे रोज चालण्याने डायबेटिज हा आजार नियंत्रणात राहतो. बऱ्याच बायबेटिज झालेल्या रुग्णांचा अनुभव आहे कि दररोज चालल्याने रक्तातील साखर प्रमाणात राहते. रोज चालल्याने आपल्या शरीरातील मांसपेशींचा चांगला व्यायाम होतो, शरीरात उष्णता निर्माण होते, हृदयाची क्रिया गतिमान होते व ते सुदृढ होते. यामुळे हृदयासंबंधीचे आजार नियंत्रणात राहतात. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगाने अर्धा तास चालणे खूपच उपयुक्त आहे. अर्ध्या तासाच्या अंतराने 150 कॅलरीज खर्च होतात. अशा प्रकारे शरीराचे वजन नियंत्रित केले जाऊ शकते.चालण्याने केवळ व्यायामच नाही तर आपली मनःस्थिती देखील चांगली होते कारण त्या दरम्यान तणाव कमी होतो आणि आंतरिक शक्ती वाढते. सुरुवातीच्या काही दिवसांत आपल्याला थकल्यासारखे वाटू शकते परंतु हळूहळू आपल्याला त्याची सवय लागेल.

Indiabright.com

शरीरातील सांध्यांना मजबूत आणि फिट ठेवण्यासाठी नियमित चालणे हा उत्तम उपाय आहे. एका नवीन अभ्यासानुसार, रजोनिवृत्तीनंतर दररोज एक तास चालणे स्त्रियांमध्ये स्तन कर्करोगाचा धोका कमी करते. ‘द अमेरिकन कॅन्सर सोसायटी’ च्या टीम ने असे म्हटले आहे की जर महिलांनी दररोज चालण्याला त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनवले तर त्या स्तन कर्करोगापासून दूर राहतील. शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी हृदयरोगाचा धोका वाढवते, परंतु जर तुम्ही दररोज तीस मिनिटे चालत असाल तर शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते जे शरीराला आवश्यक आणि फायदेशीर असतात.

runners-core.jp

Share.

Leave A Reply