सरकारी योजना:- नविन घर बांधताय मंग सरकार देतेय मोफत वाळु..! असा करा अर्ज.

0

घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा फडणवीस ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’नंतर फडणवीस यांचा नवा ‘लोकसंवाद’! राज्य सरकारच्या योजना आणि धोरणे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या मोहिमेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘लोकसंवादा’च्या माध्यमातून जनतेशी, विशेषत: सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना, या योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारच्या विविध योजना थेट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. एप्रिल २०१७ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि शाश्वत शेती, शिक्षण, गृहनिर्माण, डिजिटल प्रशासन आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची धोरणे आणि भूमिका स्पष्ट करीत जनतेशी संवाद साधला होता. मात्र या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आणि कोटय़वधी रुपयांची उधळण सरकारने केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर १०-१२ भागांनंतरच हा कार्यक्रम बंद करण्यात आला. आता पुन्हा संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार केंद्र राज्य सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, अडचणी आणि सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी- राज्यातील जनतेशी संवाद सुरू केला आहे.

indianexpress.com

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. इचलकरंजी येथील ज्योत्स्ना घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. मात्र, घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी स्वत:हून दिला अन् ‘देवेंद्रच्या रूपात देव’ भेटल्याचा आनंद झाला. कोल्हापूर जिल्ह्य़ातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, पक्के घर बांधल्यामुळे आनंद झाला असून माझ्या मित्रांनी घरावर लावलेल्या कृ.पा. निकम या नावाच्या पाटीवर बदल करून ‘देवेंद्र-मोदीजी कृपा’ असा बोर्ड लावला आहे.

Share.

Leave A Reply