‘#MeToo’ च्या वादळात अजून एका मोठ्या व्यक्तीचे नाव जोडले गेले. बॉलीवूड ला मोठा धक्का !

0

‘#MeToo’ च्या चळवळीत सामील होऊन आपले भयावह अनुभव सांगण्याच्या चळवळीत आता अजून एका महिलेचे नाव जोडले गेले आहे. हि एक महिला पत्रकार असून, करिष्मा असे तिचे नाव आहे, तिने फराह खान चा भाऊ फिल्म मेकर साजिद खान वर आरोप केले आहे. तिने ट्विटर द्वारे आपला अनुभव लोकांसोबत शेअर केला. त्यादरम्यान ती म्हणाली कि “मी एकदा साजिद खानची मुलाखत घेतली होती. यासाठी त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते, तेंव्हा ते त्यांची बहीण फराह खान सोबत राहायचे. पूर्ण मुलाखती दरम्यान ते त्यांच्या खाजगी अंगाबद्दल बोलत होते, आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते कि मला माहीत आहे कि महिलांना कसे संतुष्ट करायचे”.

twitter.com

त्या अजून सांगताना म्हणाल्या “मी सतत त्यांच्या फालतू गोष्टींना टाळून त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान काही डीव्हीडी कलेक्शन दाखवण्याच्या हेतूने साजिद रूम च्या बाहेर गेले. जेंव्हा ते परत रूम मध्ये परतले तेंव्हा ते विचित्र अवस्थेत होते. मी ताबडतोब तिथून उठून जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी मला पकडले आणि जबरदस्ती स्मूच केले. मी त्यांना ढकलले आणि तेथून पळ काढला. मुंबई लोकल मधून विले पार्ले ते विटी दरम्यान प्रवास करताना मी रडत होते. ऑफिस ला परतले आणि मी मुलाखत लिहिली कारण ते माझे काम होते”. या घटनेमुळे पुन्हा एकदा बॉलीवूड चे भयावह असे रूप बाहेर आले आहे.

या बातमीनंतर लगेचच अक्षय कुमार यांनी ‘#MeToo’ चळवळीला समर्थन देत हाउसफुल 4 या चित्रपटातुन माघार घेतली, ते म्हणाले कि जोपर्यंत या घटनेचा काही निर्णय लागत नाही तोपर्यंत ते हाउसफुल 4 चित्रपटात काम करणार नाही. हाउसफुल 4 या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान हे करत होते. अक्षय कुमार च्या या वक्तव्यानंतर काही काळातच साजिद खान यांनी जाहीर केले कि या घटनेची नैतिक जबाबदारी घेत आणि प्रोड्युसर आणि परिवारावर येत असलेल्या दबावाचा विचार करून मी हाउसफुल 4 या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून माघार घेत आहे.

dnaindia.com

Share.

Leave A Reply