मी आणि रजनीकांत सेटवर मराठीतच बोलायचो – अक्षय

0

आमच्या गप्पा या बऱ्याचदा मराठीतून व्हायच्या असं म्हणत अक्षयनं रजनीकांत यांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगायला सुरूवात केल्या. २.० चित्रपटाच्या निमित्तानं दोन सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत हे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी देवाच्या स्थानी आहे. अनेकांसाठी ते ‘थलायवा’ आहेत. पण ‘सुपरस्टार’, ‘थलायवा’, ‘देव’ यापेक्षाही त्यांची वेगळी ओळख आहे. ही ओळख म्हणजेच एक साधा, निर्मळ स्वभावाचा माणूस होय. जो कोणी त्यांना भेटतो तो त्यांच्या या रुपाच्या प्रेमात पडतो.

त्यांचं साधं वागणं, सुपरस्टार असूनही त्यांची साधी राहणी अनेकांना भावते. तेव्हा अशा या सुपरस्टारच्या प्रेमात दुसरा सुपरस्टार पडला तर नवल वाटायला नको. ‘२.०’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत काम केलेल्या अक्षय कुमारनं त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी प्रमोशनदरम्यान सांगितल्या.

ndtv.com

रजनीकांत हे महाराष्ट्रीयन आहेत त्यामुळे सेटवर जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा एकमेकांशी मराठीतूनच बोलायचो. मी मुंबईत राहिल्यानं मला मराठी येते आमच्या गप्पा या बऱ्याचदा मराठीतून व्हायच्या असं म्हणत अक्षयनं रजनीकांत यांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगायला सुरूवात केल्या. रजनीकांत यांच्यासोबत जास्तीत जास्त दिवस काम करायला मिळालं याचा मला खूपच आनंद झाला. ते खूप नम्र स्वभावाचे आहेत. ते जसे आहेत तसेच आहेत. कधीही ते दिखावा करण्याचा प्रयत्न करत नाही. दिसण्याच्या बाबतीतही ते फार विचार करत नाही. तुम्ही कधीही त्यांना भेटायला जा ते जसे आहेत तसेच तुमच्यासमोर येतील असंही अक्षय म्हणाला.

bollywoodlife.com

दिसण्याच्या बाबतीतही ते फार विचार करत नाही. तुम्ही कधीही त्यांना भेटायला जा ते जसे आहेत तसेच तुमच्यासमोर येतील असंही अक्षय म्हणाला.२.० हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. २.० चित्रपटाच्या निमित्तानं दोन सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे अक्षयचा हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. या चित्रपटात आपण जरी खलनायकाची भूमिका करत असलो तरी रजनीकांत सरांसोबत काम करण्याचं समाधान आणि आनंद खूपच वेगळा होता असंही अक्षय म्हणाला. ‘२.०’ हा ‘रोबोट’ चित्रपटाचा सिक्वल आहे. भारतातील हा सर्वात मोठा बजेट असलेला चित्रपट असून त्यासाठी जवळपास ५०० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Share.

Leave A Reply